शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या धसक्याने खासगीकरण रद्द

By admin | Updated: October 1, 2015 00:45 IST

संजय बजाज : महापौरांवर टीका; जनतेच्या हितासाठी पाणी खासगीकरणास विरोध

सांगली : महापालिका पाणी पुरवठ्याच्या खासगीकरणाविरोधात आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढला. त्याचा धसका घेऊनच सत्ताधारी व महापौरांनी खासगीकरणाचा बेत रद्द केला, असे प्रतिपादन शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत केले. बजाज म्हणाले की, महापौर विवेक कांबळे यांनी जयंत पाटील यांना घाबरत नसल्याचे सांगितले. आम्हाला घाबरण्याचेही काही कारण नाही. पण जयंतरावांनी महापालिकेच्या दारात जी जनता आणली, तिला ते घाबरले आणि पाणी पुरवठा खासगीकरणावरून यु टर्न घेतला. आता सत्ताधारी काहीही म्हणोत, पण त्यांनी राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा धसका घेतल्याचे उघड झाले आहे.पाणी पुरवठा खासगीकरणाची कुणकुण लागताच आम्ही विरोधाची भूमिका घेतली होती. महासभेतही तीव्र विरोध केला. सभागृहातील ५४ नगरसेवक विरोधात असताना महापौरांनी हुकूमशाही पद्धतीने हा ठराव मंजूर केला होता. या ठरावावर आम्ही जनतेत गेलो. त्याच्या दृश्य परिणामांची जाणीव करून दिली. जनतेनेही मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आयुक्त अजिज कारचे यांनी या ठरावाची अंमलबजावणी करणार नाही, असे स्पष्ट केले होते. तेव्हाच आम्ही ९० टक्के लढाई जिंकली होती. विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी इतिवृत्त मंजुरीवेळी मतदान घेण्याची मागणी केली. सत्ताधाऱ्यांतील बहुतांश नगरसेवकांनी खासगीकरणाविरोधात पत्रे दिली. महासभेच्या सभागृहात या ठरावाला वाढता विरोध होणार, सभागृह चालणार नाही, याची जाणीव झाल्यानेच त्यांनी ठराव मागे घेतला आहे. महापौरांच्या हुकूमशाहीला जनआंदोलनाने उत्तर दिल्याचेही बजाज म्हणाले. (प्रतिनिधी)बीओटी होणार नाहीमहापालिकेच्या काही जागा बीओटीवर विकसित करण्याचा घाट घातल्याबद्दल बजाज म्हणाले की, बीओटीबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव समोर आलेला नाही. सत्ताधाऱ्यांतच त्यावर ताळमेळ नाही. बीओटीला आमचा विरोध आहेच. पण प्रस्ताव कसा येतो, त्यावर पुढील भूमिका घेऊ. सध्या तरी बीओटी होणार नाही, असेच वाटते. पाचशे कोटी कसे?आमदार सुधीर गाडगीळ यांनी महापालिकेत पाचशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्यांनी कसा हिशेब केला आहे कुणास ठावूक! पालिकेचे उत्पन्न सव्वाशे कोटीचे. त्यातील पगार व खर्च वजा जाता वर्षाला वीस ते पंचवीस कोटी उरतात. त्या रकमेचा घोटाळा झाला तरी पाचशे कोटी होत नाहीत, असा टोलाही बजाज यांनी लगाविला.