शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST

इस्लामपूर येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेतील प्रथम विजेत्या भाग्यश्री खट्टे यांना प्रतीक पाटील यांच्याहस्ते ...

इस्लामपूर येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेतील प्रथम विजेत्या भाग्यश्री खट्टे यांना प्रतीक पाटील यांच्याहस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी रोझा किणीकर, रूपाली जाधव, सुनीता सपकाळ, सुस्मिता जाधव, सुनीता देशमाने, प्रियांका साळुंखे, उषा पंडित-मोरे, डॉ. दीपा देशपांडे, पुष्पलता खरात उपस्थित होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : समाजात निम्मी संख्या असलेल्या महिला भगिनींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी गौरी-गणपती, गृह सजावटसारख्या विविध स्पर्धा व उपक्रम सातत्याने राबविण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन युवा नेते प्रतीक पाटील यांनी केले.

शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ, महिला, युवक व युवतींच्यावतीने आयोजित घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्या महिला भगिनींना पाटील यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा ॲड. चिमण डांगे, अरुणादेवी पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने, युवक शहराध्यक्ष सचिन कोळी, नगरसेविका सुनीता सपकाळ, संगीता कांबळे, रूपाली जाधव उपस्थित होत्या.

यावेळी शहाजी पाटील, खंडेराव जाधव, महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर, उषा पंडित-मोरे, परीक्षक अनिल खटावकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

या स्पर्धेत भाग्यश्री खट्टे यांनी प्रथम, नेहा जाधव यांनी द्वितीय, सुरेखा वीरकर यांनी तृतीय, सुप्रिया पेठकर यांनी चतुर्थ, संगीता कांबळे यांनी पाचवा क्रमांक पटकाविला. स्मिता खटावकर, वैष्णवी भोसले, लक्ष्मी ताटे, माधुरी खोत, अंजली पेठकर, शैलेजा चव्हाण, राजश्री देशमुख, शारदा डुबल, कल्पना उबारे, रुची मानकर, अवंतिका क्षीरसागर, गीतांजली सूर्यवंशी, गौरी चिवटे, माधुरी पाटील याही स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या. अनिल खटावकर, संजय श्रीखंडे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

याप्रसंगी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, बँकेच्या संचालिका दीपा देशपांडे, शैलेजा जाधव उपस्थित होत्या.

युवती शहराध्यक्षा प्रियांका साळुंखे यांनी स्वागत केले. महिला राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्षा पुष्पलता खरात यांनी आभार मानले. महिला राष्ट्रवादीच्या प्रदेश सदस्या कमल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.