शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

मालगावची राष्ट्रीय पेयजल योजना वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: July 30, 2015 00:29 IST

ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न : गावांतर्गत दर्जाहीन जलवाहिनीच्या चौकशीची मागणी

अण्णा खोत -मालगाव  (ता. मिरज) येथील राष्ट्रीय पेयजल योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गावाअंतर्गत टाकलेल्या दर्जाहीन जलवाहिनीमुळे पाणी मिळत नसल्याने योजनेच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराने निकृष्ट काम केल्याचा आरोप होत आहे.मालगाव येथे पिण्याचा पाण्याची ११ कोटींहून अधिक खर्चाची राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण झाली आहे. या योजनेचे पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांच्याहस्ते उद्घाटनही करण्यात आले. मात्र या योजनेची अवस्था पूर्वीच्या प्रादेशिक योजनेसारखी होणार का, अशी शंका ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे. यापूर्वी २२ गावांसाठी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली होती. मालगावचा त्यात समावेश होता. निकृष्ट कामांमुळे या योजनेला गळतीचे प्रमाण अधिक होते. पाणीपट्टी वसुली या गळती काढण्यावर खर्च झाली. त्यामुळे पाणीपट्टीची रक्कम भरता आली नाही. परिणामी ही योजना बंद पडली. राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत गावात गल्लोगल्ली पाणी वितरणासाठी प्लॅस्टिक वाहिनी टाकण्यात आल्या आहेत. त्या टाकण्यापूर्वी तिच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात होती. जलवाहिनीचा दर्जा अधिकाऱ्यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आला होता; मात्र त्यांनी तक्रारीची दखल घेण्याऐवजी निकृष्ट वाहिनीचे समर्थन केले. गळतीमुळे दर्जाहीन वाहिनीचा पंचनामा होत आहे. पाणी पुरवठा सुरू होताच निकृष्ट दर्जाच्या वाहिन्या फुटून गळती होत असल्याच्या तक्रारी आहेत. दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडे तक्रारी येत आहेत. योजनेच्या देखभाल दुरुस्तीची ठेकेदारांवर जबाबदारी असताना जलवाहिनीची गळती काढण्याकडे दुर्लक्ष आहे. गळतीच्या वाढत्या तक्रारीने ग्रामस्थ त्रस्त आाहेत. पूर्ण झालेली पेयजल योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्याची ठेकेदाराला घाई झाली आहे. या अवस्थेत योजना ताब्यात घेतल्यास गळतीवर खर्च करून ग्रामपंचायत मेटाकुटीला येणार आहे. परिणामी या निकृष्ट कामांमुळे योजना अल्पजीवी ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जलवाहिन्यांचा दर्जा तपासावा व संपूर्ण कामाची चौकशी करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.शासनाकडे तक्रार करणार : पोतदारराष्ट्रीय पेयजल योजना कायमस्वरुपी टिकावी अशापध्दतीने अधिकाऱ्यांनी ठेकेदारांकडून काम करून घेण्याची गरज होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. जलवाहिन्या दर्जाहीन असल्याने त्या फुटू लागल्या आहेत. ग्रामस्थांना सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने निकृष्ट कामांबाबत शासनाकडे तक्रार करणार आहे. योजनेची चौकशी न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे कार्यकर्ते मधुकर पोतदार यांनी सांगितले.