शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कर थकबाकीदारांची नावे चौकाचौकांत झळकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST

फोटो -विटा नगरपालिकेचा फोटो वापरणे. दिलीप मोहिते लोकमत न्यूज नेटवर्क विटा : लॉकडाऊनमुळे अर्थचक्र थांबलेल्या विटा नगरपालिकेने आता मार्चअखेरमुळेे ...

फोटो -विटा नगरपालिकेचा फोटो वापरणे.

दिलीप मोहिते

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : लॉकडाऊनमुळे अर्थचक्र थांबलेल्या विटा नगरपालिकेने आता मार्चअखेरमुळेे मालमत्ता कर वसुली जोमात सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांपासून थकीत असलेल्या व चालू वर्षाच्या करवसुलीसाठी पालिका प्रशासनाने आता कडक धोरणाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दि. ३१ मार्चपूर्वी कराची थकीत रक्कम न भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांची नावे शहरातील चौकाचौकांत डिजिटल फलकावर झळकणार आहेत.

गेल्या वर्षभरापासून सततच्या लॉकडाऊनमुळे अनेक मालमत्ताधारक कराची रक्कम भरू शकले नाहीत. परिणामी, पालिकेचे वर्षभराचे अर्थचक्रच थांबले होते. मात्र, आता पालिका प्रशासनाने कराची थकीत रक्कम भरून घेण्यासाठी ताकद लावली आहे.

विटा नगरपालिकेकडे पाणीपट्टी, घरपट्टी, जाहिरात, अग्निशमन यासह अन्य कर रूपाने जमा होणाऱ्या रकमेपैकी जवळपास ७० टक्के खर्च पिण्याच्या पाणी योजनांवर होत आहे. त्यामुळे उर्वरित रकमेत नागरिकांना अन्य सुविधा देण्यासाठी पालिकेला चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून कराची रक्कम न भरलेले अनेक मालमत्ताधारक आहेत. त्यात काही बड्या मालमत्ताधारकांचा समावेश आहे.

त्यामुळे यावर्षी थकीत कर जमा करण्यासाठी अंतिम टोकाचा निर्णय घेतला जाणार आहे. कराची थकीत रक्कम न भरल्यास नळकनेक्शन तोडण्यासह जप्तीची कारवाईही होणार आहे. त्यापूर्वी थकबाकीदारांची नावे डिजिटल फलकाद्वारे शहरातील प्रत्येक चौकात झळकविण्यात येणार आहेत.

चौकट :

थकबाकी तातडीने भरा

विट्यात कर थकबाकीदारांची यादी मोठी आहे. काहीजणांवर कारवाईही केली; परंतु उर्वरित थकबाकीदार अजूनही बिनधास्त आहेत. त्यामुळे कर वसुलीची मोहीम गतिमान केली आहे. जे कोणी मालमत्ताधारक पालिकेचा कर वेळेत भरणार नाहीत, त्यांची नावे चौकाचौकांत डिजिटल फलकावर लावण्यात येणार आहेत. त्यामुळे थकबाकी तातडीने पालिका प्रशासनाकडे जमा करावी, असे आवाहन मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी केले आहे.