महापालिकेचा ऑक्सिजन प्लांट अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST2021-08-26T04:29:34+5:302021-08-26T04:29:34+5:30

सांगली : महापालिकेच्या वतीने मिरज तंत्रनिकेतनमधील कोविड हाॅस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांटची उभारणी सुरू आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ...

Municipal Oxygen Plant in final stage | महापालिकेचा ऑक्सिजन प्लांट अंतिम टप्प्यात

महापालिकेचा ऑक्सिजन प्लांट अंतिम टप्प्यात

सांगली : महापालिकेच्या वतीने मिरज तंत्रनिकेतनमधील कोविड हाॅस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांटची उभारणी सुरू आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, या महिन्याअखेरीपर्यंत प्लांट कार्यान्वित होईल, अशी माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी बुधवारी दिली. लहान मुलांसाठी ६० बेड्सचे हेल्थ सेंटर उभारल्याचेही त्यांनी सांगितले.

कापडणीस म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासली. त्यात तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन ज्यादा लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे महापालिकेने ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. त्याला सर्वच सदस्यांनी साथ दिली. १२५ जम्बो सिलिंडर भरण्याची क्षमता असलेला प्लांट उभारला जात आहे. सिकंदराबाद येथील लॅडस्काय कंपनीला हे काम दिले आहे. प्लांट उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. इन्स्टाॅलेशनचे काम सुरू आहे. महिन्याअखेरीपर्यंत हे काम पूर्ण होईल.

मिरज तंत्रनिकेतनमध्ये कोविड रुग्णालय व विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. आता लहान मुलांसाठी ६० बेड्सचे सेंटर सज्ज ठेवले आहे. तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव लहान मुलांना अधिक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज केली आहे. महापालिकेमार्फत आवश्यक ती सर्व दक्षता घेतली जात असल्याचेही कापडणीस यांनी सांगितले.

Web Title: Municipal Oxygen Plant in final stage