मिरज : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेतर्फे मुंबई-कोल्हापूर एक विशेष एक्स्प्रेस धावणार आहे. कोल्हापूर ते मुंबई-विशेष गाडी (क्रमांक ०१४०२) ही विशेष एक्स्प्रेस शुक्रवार, दि. ५ रोजी दुपारी ४.४० वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून सुटेल. गाडीचे थांबे व वेळा पुढीलप्रमाणे, हातकणंगले सायं. ५.००, जयसिंगपूर सायं. ५.२०, मिरज सायं. ५.३५, सांगली सायं. ५.५५, किर्लोस्करवाडी सायं. ६.२०, कराड सायं. ६.५०, सातारा रात्री ८.००, लोणंद जंक्शन रात्री ९.००, जेजुरी रात्री ९.३०, पुणे रात्री ११.२०, चिंचवड रात्री ११.५०, लोणावळा रात्री १२.५०, कल्याण रात्री २.५०, ठाणे- रात्री ३.२०, दादर रात्री ३.४२ व मुंबई सीएसएमटी येथे पहाटे ४.०० वाजता पोहोचेल. मुंबई ते कोल्हापूर-विशेष गाडी (क्रमांक ०४०१) ही गाडी शनिवार, दि. ६ रोजी रात्री १०.३० वाजता मुंबई सीएसएमटी येथून सुटेल व छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे सकाळी १०.०० वाजता पोहोचेल.
Web Summary : Central Railway will run special Mumbai-Kolhapur express trains for Dr. Babasaheb Ambedkar's Mahaparinirvan Day. The Kolhapur-Mumbai special departs December 5th at 4:40 PM, reaching Mumbai at 4:00 AM. The Mumbai-Kolhapur special leaves December 6th at 10:30 PM, arriving at 10:00 AM. Check stops and timings.
Web Summary : मध्य रेलवे डॉ. बाबासाहेब अम्बेडकर के महापरिनिर्वाण दिवस के लिए मुंबई-कोल्हापुर विशेष एक्सप्रेस चलाएगा। कोल्हापुर-मुंबई विशेष 5 दिसंबर को शाम 4:40 बजे रवाना होकर सुबह 4:00 बजे मुंबई पहुंचेगी। मुंबई-कोल्हापुर विशेष 6 दिसंबर को रात 10:30 बजे रवाना होकर सुबह 10:00 बजे पहुंचेगी। स्टॉप और समय जांचें।