शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

अडत वसुली केल्यास आंदोलन : संजय कोले

By admin | Updated: December 25, 2014 00:09 IST

अडत, हमाली, तोलाई, लेव्ही आदी खर्च शेतकऱ्यांकडून न घेता संबंधित खरेदीदाराकडून वसूल करण्यात यावा, असा पणन संचालकांचा आदेश

सांगली : देशातील बहुतांशी राज्यात अडत वसुली खरेदीदार, व्यापारी यांच्याकडूनच करण्यात येते. परंतु महाराष्ट्र याला अपवाद आहे. राज्यात भविष्यात अडत शेतकऱ्यांकडून वसूल केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा खासदार शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय कोले यांनी पत्रकार बैठकीत दिला.अडत, हमाली, तोलाई, लेव्ही आदी खर्च शेतकऱ्यांकडून न घेता संबंधित खरेदीदाराकडून वसूल करण्यात यावा, असा पणन संचालकांचा आदेश असल्याचे सांगून कोले म्हणाले की, परंतु तत्कालीन शिवसेना-भाजप सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली होती. वास्तविक तत्कालीन पणनमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी देखील अडत खरेदीदाराकडून वसूल करण्यास संमती दिली होती. १९९५ मध्ये पणन संचालक बी. डी. पवार यांनी अडत खर्च, खरेदीदार, व्यापारी यांच्याकडून वसूल करण्याचे आदेश दिले होते. परंतु नंतर हा निर्णय बारगळला. अडत वसुली खरेदीदारांकडूनच करावी, अशी शेतकरी संघटनेची प्रारंभापासूनची मागणी आहे. यासाठी कित्येकवेळा आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र सध्या देखील काँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताब्यातील बहुतांश बाजार समित्यांनी शेतकऱ्यांची लूट सुरुच ठेवली आहे. इतर सर्व मालाबाबत त्याची किंमत ठरविण्याचा अधिकार उत्पादकाला आहे. मग शेतकऱ्याला हा अधिकार मिळाला पाहिजे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम १९६३ मध्ये देखील याचा कोठेच उल्लेख नाही. त्याचप्रमाणे अडत शेतकऱ्यांकडून वसूल करावी, असेही नमूद करण्यात आलेले नाही. हा निर्णय संबंधित बाजार समित्यांनी घ्यावयाचा आहे. यामुळे शासन आदेशाचा चुकीचा अर्थ काढून बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेऊ नये. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा. यासाठी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटूनही निवेदन देणार असल्याचेही कोले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)