शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सैन्य दलातील जवान हे भारतमातेचे भूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST

कडेगाव : भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण आहेत. अशा सैनिकांचा जनतेला ...

कडेगाव :

भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण आहेत. अशा सैनिकांचा जनतेला अभिमान असतो. आपल्या गावचे सुपुत्र देशाचे रक्षण करतात. त्यांचा अभिमान बाळगून त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा, असे प्रतिपादन आमदार मोहनराव कदम यांनी केले.

तडसर (ता. कडेगाव) येथील प्रवीण हिंदुराव पवार हे सैनिक सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार मोहनराव कदम बोलत होते. प्रवीण पवार म्हणाले, माझ्या गावात आपुलकीने माझा सन्मान झाला, याचा गर्व नक्कीच आहे. भारतीय सैन्य दलातील चांगली सेवा देता आली. याचा अभिमानही आहे.

यावेळी प्रवीण पवार यांच्या मातोश्री सुलोचना पवार यांचाही सत्कार झाला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, सरपंच हणमंत पवार, सुरज पवार, दीपक पवार, उद्योजक राजेंद्र पवार, संजय माळी, महेंद्र पवार आदी उपस्थित होते.

धनंजय नरुले यांनी सूत्रसंचालन केले. दीपक पवार यांनी आभार मानले.

फोटो-२९कडेगाव१

फोटो ओळ : तडसर (ता. कडेगाव) येथे सेवानिवृत्त सैनिक प्रवीण पवार यांचा आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी हणमंत पवार, सुलोचना पवार, प्रकाश जाधव, सुरज पवार उपस्थित होते.