शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पश्चिममध्ये दमदार लढती--ग्रामपंचायत निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 23:31 IST

कसबे डिग्रज : इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील मिरज पश्चिम भागातील कसबे डिग्रज मंडलमधील कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, समडोळी, दुधगाव, सावळवाडी या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार

ठळक मुद्देस्थानिक गटही ताकद दाखविणार, राष्टÑवादीविरोधात आघाड्या होणार

लोकमत न्यूज नेटवर्ककसबे डिग्रज : इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील मिरज पश्चिम भागातील कसबे डिग्रज मंडलमधील कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, समडोळी, दुधगाव, सावळवाडी या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघाले आहे. राष्टÑवादी निवडणूक लढवीत असताना कॉँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, भाजप काही ठिकाणी एकत्र येताना दिसत आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

मौजे डिग्रजमध्ये राष्टÑवादीविरोधात सारे एकत्र अशी स्थिती आहे. पण जिल्हा पातळीवर पद भूषविलेले कॉँग्रेसचे एक पदाधिकारी राष्टÑवादीच्या गटाबरोबर जाण्याच्या तयारीत आहेत. बाजार समिती संचालक कुमार पाटील, शेतकरी संघटनेचे सुनील फराटे, प्रकाश कोळी, सौ. संयोगीता कोळी, राष्टÑवादीचे भालचंद्र पाटील याचप्रमाणे लोंढे गट आदींच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणाºया आहेत.

समडोळीमध्ये यावेळी दमदार निवडणूक होणार आहे. गतवेळी राष्टÑवादीच्या वैभव पाटील यांनी सर्वपक्षीय आघाडीने विरोध करुन १७-० अशी ग्रामपंचायत जिंकली होती. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील व माजी सरपंच राष्टÑवादीचे वैभव पाटील एकत्र येताना दिसत आहेत, तर माजी सरपंच ज्येष्ठ नेते महावीर चव्हाण, स्वाभिमानीचे संजय बेळे हे एकत्र आले आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील, अप्पासाहेब पाटील यांच्या भूमिका निर्णायक ठरणाºया आहेत. त्याचबरोबर भाजपचे अजित ढोले पॅनेल करण्याच्या तयारीत दिसतात. सरपंचपद अनुसूचित जातीसाठी आहे.

दुधगावमध्ये गतवेळच्या निवडणुकीपेक्षा यावेळी मोठी वेगळी स्थिती आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुरेखा आडमुठे विजयी झाल्याने खा. राजू शेट्टींच्या गटात मोठे महत्त्व आले आहे. कॉँग्रेसचा एक गट सक्रिय आहे. माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद आवटी, विलास आवटी, संदेश आडमुठे गट, बाबासाहेब सांद्रे यांच्या भूमिका निर्णायक ठरणाºया आहेत. निवडणूक लक्षवेधी ठरणारी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार, अशी परिसरात चर्चा आहे.

सावळवाडीत माणगावे गट, नितीन दणाणे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ताकद दाखविणारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा गट सत्तेसाठी लढणार आहे. तुंग येथील वसंतदादा कारखाना माजी संचालक सचिन डांगे व स्वाभिमानीच्या पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री सचिन डांगे यांची भूमिका मतदार संघात महत्त्वाची आहे.एकंदरीत खा. राजू शेट्टी, जयंत पाटील, सदाभाऊ खोत, विशाल पाटील आपापले समर्थक निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.कसबे डिग्रजमध्ये : गुंतागुंतीची समीकरणेकसबे डिग्रजमध्ये राष्टÑवादी विरुध्द ग्रामविकास आघाडी अशी प्रमुख लढत होणार आहे, पण राष्टÑवादीचा एक गट सवतासुभा मांडून आहे. आ. जयंत पाटील यांनाही हा गुंता सोडविता आला नाही. राष्टÑवादीचे आनंदराव नलवडे, मोहनराव देशमुख, सरपंच अण्णासाहेब सायमोते, कुमार लोंढे सक्रिय झाले आहेत. अजयसिंह चव्हाण पंचायत समिती निवडणुकीत त्यांच्यासोबत होते; पण ते स्वतंत्र राष्टÑवादी गट म्हणून सक्रिय आहेत. कॉँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, उद्योजक बाळासाहेब शिंदे यांना अनेक मातब्बर ज्येष्ठांची साथ दिसत आहे. स्वाभिमानी व सदाभाऊ खोत भाजप गट यांच्यासोबत जाणार का, असा प्रश्न आहे.