शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Social Viral: 'लाडकी बहीण' योजनेवरुन मिम्सचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 18:02 IST

भाऊ, दाजी अन् मेहुण्यांचाही मुख्यमंत्र्यांकडे लाडके होण्याचा हट्ट

जालिंदर शिंदेघाटनांद्रे : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ''मुख्यमंत्री लाडकी बहीण'' योजनेच्या संदर्भात सोशल मीडियावर अनेक गमतीजमती सांगणाऱ्या मिम्सने (रील्सने) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पुरुषांनी लाडका भाऊ योजनेची सरकारकडे जोरदार मागणी सुरू केली आहे.परंतु, शासनाच्या जाचक अटीमुळे या लाडक्या बहिणीलाच आपण सावत्र असल्याचे वाटत असल्याची भावना व्यक्त होत आहे. लाडका भाऊ योजना, लाडकी बायको योजना, ''लाडका मेहुणा'' योजनेच्याही मागण्या करणाऱ्या गमतीदार मिम्स (रील्स) मनोरंजक ठरत आहेत.लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून सोशल मीडियावर या योजनेचे सर्वाधिक मिम्स (रील्स) व्हायरल होऊ लागले आहेत.सोशल मीडियावर सर्वाधिक प्रतिसाद मिळवणारी ही शासकीय योजना सध्या ठरली आहे. एरवी शासकीय योजनांची माहिती सोशल मीडियावर फारशी चर्चेला कधी येत नाही. पण, या योजनेच्या बाबतीत मात्र अगदी उलटे झाले आहे. पुरुष मंडळींकडून महिलांच्या नावाने योजना सुरू होत असल्याने अगदी जळफळाट व्यक्त करणारे मिम्स (रील्स) पाहण्यास मिळत आहेत.

लाडका भाऊ बेकार आहे, त्यांनाच काही तरी पैसे द्यावेत, असे संदेश फिरतानाचे दिसत आहेत. लग्नाआधीच एकटा भाऊ तोही बेरोजगार आहे. त्यांची योजनेची मागणी हास्याच्या फवाऱ्यात नेहत आहे. जावयाकडून लाडक्या मेहुण्यासाठी ''लाडका पावणा'' योजना सुरू करण्याच्या गमतीने, तर वाचकांची हसता हसता पुरेवाट होऊ लागली आहे. घरात महिलांशी पुरुषांनी सन्मानाने वागावे. कारण आता त्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी झाल्या आहेत, असाही संदेश हास्याची लक्तरे टांगू लागला आहे.महिला लाभार्थीच्या संदर्भात तर अगदी तुफानी मिम्स (रील्स) सुरू आहेत. योजनेच्या जाचक अटीमुळे लाडकी बहीणऐवजी ही ''सावत्र बहीण योजना'' करावी, अशा मागणीचाही मीम्स (रील्स) फिरू लागल्या. नंतर लगेच जाचक अटी शिथिल झाल्याने पुन्हा सावत्रऐवजी बहीण आता पुन्हा लाडकी वाटू लागली आहे. काही महिलांनी मोफत एसटीसाठी प्रवासासाठी आपले वय वाढवून घेतल्याने आता या बहिणीला योजनाच मिळणार नाही, असाही संशोधनपर मिम्स (रील्स)समोर आला आहे. त्यामुळे त्यांची मोठी पंचायत झाल्याचेही समोर आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीSocial Viralसोशल व्हायरल