शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

हजरजबाबीपणा, चिमटे अन् खेचाखेची; सांगलीत अजितदादांच्या आठवणी ताज्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:57 IST

Ajit Pawar Passed Away: कधी कधी ईर्ष्येतून चांगले घडत असते

सांगली : प्रदीर्घ काळ सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रभाव राहिला. बुधवारी त्यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील अनेक प्रसंगांचा कोलाज यानिमित्ताने तयार झाला. येथील अनेक सभा त्यांनी गाजविल्या. स्थानिक व राज्यस्तरीय नेत्यांना चिमटे घेत फुलविलेली अनेक भाषणे जिल्ह्यात नोंदली. मात्र, या सर्वांत आष्टा येथील गाजलेले एक भाषण यानिमित्ताने पटलावर चर्चेत आले. या भाषणात त्यांनी सर्वांना खळखळून हसविले होते.आष्टा येथील ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमास त्यावेळी आमदार जयंत पाटील व दिवंगत नेते आर. आर. पाटीलही उपस्थित होते. कार्यक्रमास पवार तीन तास उशिरा आले होते. त्यावर ते म्हणाले होते, मला उशीर झाला ते बरेच झाले. त्यानिमित्ताने आर. आर. पाटील व जयंत पाटील यांना एक तास संवाद साधता आला, हे काय थोडे आहे! वेळेत पोहोचलो असतो, पण कधी नव्हे ती संधी मिळालेल्या पृथ्वीराज देशमुखांनी गावोगावी अडवून सत्कार घेतल्याने खरा उशीर झाला.

वाचा: मदन, तुझा अन् माझा स्वभाव जुळतो, तू माझ्यासोबत ये!, अजितदादांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले येथील सैनिक शाळेच्या विषयावरही त्यांनी अण्णासाहेब डांगे आणि आर. आर. पाटील यांना छेडले होते. डांगे यांच्याकडे पाहत ते म्हणाले होते, शासनाकडून मंजूर झालेली सैनिक शाळा आष्ट्यातून तासगावला गेली, ही गोष्ट तुमच्या जिव्हारी लागलेली दिसते. तासगावला शाळा गेली तरी ईर्ष्येतून तुम्ही दुसरी सैनिक शाळा उभी केली. कधी कधी ईर्ष्येतून चांगले घडत असते.एकीकडे स्थानिक विषयांवर चिमटे घेताना अजित पवारांनी त्यावेळी विलासराव देशमुखांसह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवरही टीका केली होती. महागाईच्या प्रश्नावर काहींनी आम्हाला सल्ला दिला. आम्ही सल्ले देण्यापेक्षा कृतीवर भर देतो. उचलली जीभ की लावली टाळ्याला, अशी आमच्या मंत्रिमंडळाची गत आहे.

वाचा: बहिणीच्या सासूरवाडीशी अजित पवारांनी जपले होते जिव्हाळ्याचे नातेयेथील संकुलात वृक्षारोपण करताना मला अशोकाच्या झाडाची आठवण झाली. त्यावेळी मी गमतीने अशोकाच्या झाडावर टीका केली तर त्याचा संबंध अशोक चव्हाण यांच्याशी जोडला गेला. त्यांच्या या वाक्यानंतर उपस्थितांसह आर. आर. पाटील व जयंत पाटील खळखळून हसले होते.स्त्री भ्रूणहत्येवर पोटतिडकीने काही मते मांडत त्यांनी सांगली जिल्ह्यातील मुलींची संख्या कमी असलेल्या तालुक्यांची नावे वाचली. त्यांनी पलूस, वाळवा अशी नावे वाचली. मात्र, अरे, हे कोणी दिले माझ्या हाती, असे म्हणत त्यांनी वाचन थांबविले. त्यावेळी दोन्ही मंत्र्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's wit, banter, and memories refreshed in Sangli.

Web Summary : Ajit Pawar's long-standing influence in Sangli politics was remembered after his death. A highlight was his humorous speech in Ashta, teasing leaders like Jayant Patil and R.R. Patil, and humorously addressing local issues and even national politics with his characteristic wit.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामतीDeathमृत्यूSangliसांगली