सांगली जिल्हा परिषदेत सत्तेसाठी बैठकांचा सिलसिला सुरू, राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी वाटाघाटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:31 IST2026-02-11T15:30:25+5:302026-02-11T15:31:20+5:30

शिंदेसेनेचे पत्तेही महत्त्वाचे, पालकमंत्री आज सांगलीत

meetings for power in Sangli Zilla Parishad continue, negotiations to bring NCP along | सांगली जिल्हा परिषदेत सत्तेसाठी बैठकांचा सिलसिला सुरू, राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी वाटाघाटी 

सांगली जिल्हा परिषदेत सत्तेसाठी बैठकांचा सिलसिला सुरू, राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी वाटाघाटी 

सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. सत्तेचा घट बसविण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) सोबत घेण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. शिंदेसेनेचे पत्तेही महत्त्वाचे ठरले आहेत.

महाविकास आघाडी आणि भाजप महायुतीला बहुमत नसल्याने कोंडी झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाही बहुमतासाठी एकच जागा कमी पडत आहे. तर महायुतीचे बहुमत ३१ जागांसह काठावर आहे. अर्थात यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) गृहीत धरले आहे. त्यामुळे आघाडीकडून राष्ट्रवादी नेत्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. भाजपनेही त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू केल्या आहेत.

दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील हे बुधवारी सांगलीत आहेत. ते भाजपसह महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. बहुमतासाठी अन्य पक्षांसोबतही चर्चा करण्याची शक्यता आहे. सांगलीत विश्रामबागमध्ये त्यांची पक्षीय बैठक होणार आहे.

निकालात सर्वाधिक १८ जागा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला, भाजप १६, काँग्रेस ११, शिवेसना ७ आणि अजित पवार राष्ट्रवादीला ६ जागा मिळाल्या. तर रयत क्रांती पक्ष आणि जनसुराज्यने प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. त्यामुळे सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे.

भाजपकडूनही सत्तेसाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात येत आहे. सांगलीत जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. महायुतीची मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सर्व घटक पक्षांना सोबत घ्यावे, असा सूर पक्षनेत्यांचा आहे. सर्वजण एकत्र राहिल्यास महायुतीला सत्ता कायम राखण्यात अडचण नसल्याचे आमदारांचे म्हणणे आहे.

महायुतीतील घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील संपर्क साधत आहेत. महायुतीतील सर्व पक्ष एकत्र येतील, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे.

जयंत पाटीलही आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आमदार जयंत पाटील यांनीही मंगळवारी अजित पवार गटाच्या नेत्यांशी संवाद साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार संजय पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे हे आघाडीसोबत जाण्यास राजी असल्याचे समजते. त्यांच्याशी याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र याबाबतचा अधिकृत निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, असेही सांगण्यात आले.

Web Title : सांगली जिला परिषद: सत्ता के लिए बातचीत शुरू, NCP महत्वपूर्ण

Web Summary : सांगली जिला परिषद चुनावों में गठबंधन की बातचीत शुरू हो गई है क्योंकि किसी भी पार्टी को बहुमत नहीं मिला है। NCP के साथ बातचीत महत्वपूर्ण है। भाजपा और महा विकास अघाड़ी सत्ता के लिए प्रतिस्पर्धा कर रहे हैं, सबकी निगाहें संभावित गठबंधनों पर हैं।

Web Title : Sangli Zilla Parishad: Talks Begin for Power, NCP Crucial

Web Summary : Sangli Zilla Parishad elections see coalition talks as no party secures a majority. Negotiations with NCP are key. BJP and Maha Vikas Aghadi vie for power, with all eyes on potential alliances to secure control.