शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विक्रम सावंत यांच्या वाढदिनानिमित्त जत येथे ‘माळरान कृषी प्रदर्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST

जत : आमदार विक्रम सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जत येथे विक्रम फाऊंडेशनच्यावतीने ४ ते ७ फेब्रुवारीदरम्यान एस. आर. व्ही. ...

जत : आमदार विक्रम सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जत येथे विक्रम फाऊंडेशनच्यावतीने ४ ते ७ फेब्रुवारीदरम्यान एस. आर. व्ही. एम. हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर माळरान कृषी, पशु प्रदर्शन आणि कृषी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विक्रम फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. युवराज निकम व माजी सभापती बाबासाहेब कोडग यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार उपस्थित होत्या.

निकम म्हणाले, पतंगराव कदम यांची प्रेरणा व आदर्श समोर ठेवून आमदार विक्रम सावंत हे जत तालुक्यातील जनतेचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जतसारख्या दुष्काळी भागात माळरान कृषी प्रदर्शन घेतल्यामुळे येथील शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेती व्यवसायात प्रगती साध्य करता येणार आहे. पाण्याचे नियोजन, पीक पध्दत, बाजारभाव कसे असावेत, त्यामुळे शेतकऱ्यांना सुख व समृध्दी मिळेल, यावर सविस्तर मार्गदर्शन या प्रदर्शनात होणार आहे. प्रदर्शनात तीनशे स्टॉल्स व ३ हजारहून अधिक उत्पादने असणार आहेत. यामध्ये हॉर्वेस्टर, ड्रिप इरिगेशन, शेतीविषयक अवजारे, यंत्रसामग्री. बी-बियाणे, फर्टिलायझर्स, हरितगृहे. जैव-विज्ञान, पशुपैदास, कुक्कुटपालन, डेअरी मशिनरी, अन्न साठवण प्रक्रिया, प्रकाशने, सॉफ्टवेअर्स आदींचे स्टॉल्स असणार आहेत.

शेती व्यवसायात आधुनिक व इतर तंत्रज्ञान वापरून प्रगती केलेल्या शेतकऱ्यांचा प्रदर्शनात सन्मान होणार आहे. ४ फेब्रुवारी रोजी पशु प्रदर्शन, मत्स्य शेतीची प्रात्यक्षिके, मान्यवरांची शेतीच्या विविध विषयांवर चर्चासत्रे, द्राक्ष, बेदाणा, पेरू पीक स्पर्धा, धान्य महोत्सव, शेतकरी ते ग्राहक यांचे स्टॉल्स, सहजासहजी न मिळणाऱ्या वस्तूंचे कंझ्युमर प्रदर्शन, महिला बचत गट व त्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी महिला बचत गटाने आयोजित केलेले फूड फेस्टिव्हल, ॲग्रो स्टार्टअप, स्वतंत्र पॅव्हेलियन, शासनाच्या विविध योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कृषी व सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार, महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, सामाजिक न्याय व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार मोहनराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन, कृषी उत्पन्न बाजार समिती, जत, महिला विकास महामंडळ, नाबार्ड, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचे प्रदर्शनासाठी सहकार्य मिळणार आहे. प्रदर्शनाचे नियोजन रिसोर्सेसचे संचालक राजेश शहा करत आहेत. प्रदर्शन पाहण्यासाठी मोफत प्रवेश आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार विक्रम सावंत यांनी केले आहे.

चौकट

नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार यांच्याहस्ते प्रदर्शन मंडप उभारणीचा प्रारंभ शनिवारी करण्यात आला. यावेळी आमदार विक्रम सावंत, ॲड. युवराज निकम, बाबासाहेब कोडग, सुजय शिंदे, भूपेंद्र कांबळे, नीलेश बामणे, फिरोज नदाफ, गणेश गिड्डे, धीरज सावंत, नामदेव काळे उपस्थित होते.

फोटो : ३० जत १