शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेस करा पैशाची मदत!

By admin | Updated: June 11, 2015 00:26 IST

निधीसाठी फलक : मिरजेत नागरिक त्रस्त

मिरज : रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने मिरजेतील त्रस्त नागरिकांनी मंगळवार पेठेतील चर्च रस्त्यावर खड्ड्यात झाडाची फांदी लावून, ‘महापालिकेस पैशाची मदत करा’, असा उपरोधिक फलक लावला आहे. महापालिकेकडे निधी नसल्याने प्रमुख रस्त्यांचे काम रखडले आहे. शहरातील चर्च रोड, गांधी चौक ते शिवाजी चौक, गणेश तलाव ते मार्केट, हिरा हॉटेल ते शहर पोलीस ठाण्यापर्यंतच्या या रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणत खड्डे पडल्याने यातूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था असताना, पावसाळा तोंडावर आल्याने नागरिक हैरण आहेत. रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आराखडा तयार आहे. मात्र निधीअभावीअद्याप रुंदीकरण रखडले आहे. या प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत. खराब रस्त्यांच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त असताना, महापालिकेचे मात्र दुर्लक्ष आहे. शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने महापालिकेने रस्त्यांचे रुंदीकरण, खड्डे भरणे व डांबरीकरण करुन खराब रस्त्यांचा प्रश्न निकाली काढणे आवश्यक आहे. चर्च रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने येथे वाहनधारकांची कसरत सुरु आहे. त्यातच ड्रेनेजचे झाकण तुटल्याने ड्रेनेज चेंबरमध्ये दुचाकी वाहन अडकून वाहनधारक जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रार केल्यानंतरही महापालिका प्रशासनाने ड्रेनेजचे चेंबर बंद केलेले नाही. यामुळे नागरिकांनी फलक लावला होता. दिवसभर या फलकाची चर्चा सुरु होती. मात्र महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नसल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. (वार्ताहर)