सांगली जिल्हा परिषदेत ‘मिरज पॅटर्न’; ‘घड्याळ’ बांधलेल्या ‘हातात’ ‘तुतारी’ घेऊन ‘ऑपरेशन लोटस’ला चकवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 18:45 IST2026-03-16T18:44:15+5:302026-03-16T18:45:03+5:30

भाजप कोणते राजकीय डावपेज लढविणार याकडे लक्ष

Mahavikas Aghadi poses a challenge to BJP in forming government in Sangli Zilla Parishad | सांगली जिल्हा परिषदेत ‘मिरज पॅटर्न’; ‘घड्याळ’ बांधलेल्या ‘हातात’ ‘तुतारी’ घेऊन ‘ऑपरेशन लोटस’ला चकवा

सांगली जिल्हा परिषदेत ‘मिरज पॅटर्न’; ‘घड्याळ’ बांधलेल्या ‘हातात’ ‘तुतारी’ घेऊन ‘ऑपरेशन लोटस’ला चकवा

सांगली : `जिल्हा परिषदेत खासदार विशाल पाटील यांनी कॉंग्रेसची सत्ता आणूनच दाखवावी` असे जाहीर आव्हान देणाऱ्या भाजपनेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच महाविकास आघाडीने आता आव्हान निर्माण केले आहे. आघाडीच्या ३६ सदस्यांना अज्ञात स्थळी रवाना करत ऑपरेशन लोटसपासून सुरक्षित ठेवले आहे. या स्थितीत भाजप कोणते राजकीय डावपेच लढवणार? याकडे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेत सदस्यसंख्या ६१ असून, बहुमतासाठी ३२ सदस्यांची आवश्यकता आहे. पण भाजपकडे बहुमताच्याही निम्मे म्हणजे १६ सदस्य आहेत. जनसुराज्य आणि रयत क्रांती संघटना या मित्रपक्षांचे एकूण दोन सदस्य आहेत. या तिघांची गोळाबेरीज १८ वर पोहोचते. हे संख्याबळ बहुमताच्या जवळही नाही.

राज्यातील सत्तेत नैसर्गिक घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेचे सात सदस्य आहेत. त्यांना सोबत घेऊनही बहुमताचा पल्ला गाठता येत नाही. अर्थात, शिंदेसेनेनेही भाजपला पाठिंबा देण्यास नकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सध्याचे सर्वच राजकीय चित्र भाजपविरोधात आहे. या स्थितीत पालकमंत्री पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना कोणत्या डावपेचांच्या जोरावर आव्हान दिले असावे? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दोन्ही राष्ट्रवादींचे ‘मिरज पॅटर्न पुन्हा’!

मिरज पंचायत समितीत सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेने केली. आता हाच पॅटर्न जिल्हा परिषदेतही राबवला जाण्याची चिन्हे आहेत. महायुती म्हणून भाजपकडे पुरेसे संख्याबळ आहे. अजित पवार गट, शिंदेसेना, जनसुराज्य व रयत क्रांतीसह भाजपचे एकत्रित संख्याबळ ३१ होते. काठावरच्या बहुमतासह सत्तेपर्यंत पक्ष पोहोचू शकतो. पण मिरज पंचायत समितीच्या यशानंतर आत्मविश्वास वाढलेल्या आघाडीच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेतही भाजपचा गेम करण्याची खेळी रचली आहे. त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादींसह काँग्रेस आघाडीचे ३६ सदस्य गायब झाले आहेत.

राष्ट्रवादी (शरद पवार) नेते आमदार जयंत पाटील आणि काँग्रेस नेते आमदार डॉ. विश्वजित कदम यांची सोमवारी सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा होणार आहे. त्यानंतर मंगळवारी दोन्ही राष्ट्रवादींसह काँग्रेस आणि आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची सांगलीत बैठक होईल. बुधवारच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसंदर्भात निश्चित धोरण या बैठकीत ठरेल. - देवराज पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार)

Web Title : सांगली जिला परिषद में 'मिरज पैटर्न', एमवीए ने 'ऑपरेशन लोटस' को किया नाकाम

Web Summary : सांगली में एमवीए ने रणनीतिक रूप से सदस्यों को सुरक्षित किया, जिला परिषद में भाजपा के शक्ति प्रदर्शन को चुनौती दी। कांग्रेस, एनसीपी और शिवसेना ने भाजपा को सत्ता से बाहर रखने के लिए 'मिरज पैटर्न' दोहराया।

Web Title : Miraj Pattern in Sangli Zilla Parishad, MVA Foils Lotus Operation

Web Summary : Sangli MVA strategically secures members, challenging BJP's power play in Zilla Parishad. Congress, NCP, and Shiv Sena replicate 'Miraj Pattern' to keep BJP out of power, leveraging their numbers for a potential win.