शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राजरत्न आंबेडकर, जयश्रीताई यांच्यासह सांगली जिल्ह्यात आठ मतदारसंघांतील २४ अर्ज अवैध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 15:19 IST

४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत : बहुतांशी अर्जाला पक्षाचा एबी फार्म नसल्याने अवैध

सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या अर्जांची बुधवारी छाननी झाली. त्यामध्ये २४ उमेदवारी अर्ज अवैध ठरले. मिरज मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज कागदपत्रांतील त्रुटींमुळे अवैध ठरला. अन्य उमेदवारी अर्ज पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरले असून, त्यांचे अपक्ष अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान, ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत असणार आहे.मिरज मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजरत्न आंबेडकर यांचा अर्ज कागदपत्रांतील त्रुटींमुळे अवैध ठरला. अर्ज छाननीत राजरत्न आंबेडकर यांच्यासह अपक्ष उमेदवार नंदादेवी कोलप, अपक्ष अरुण धोतरे, काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने मोहन वनखंडे, सागर वनखंडे यांचे अर्ज अवैध झाले. मात्र त्यांचे अपक्ष अर्ज वैध ठरले. २७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.शिराळा विधानसभेसाठी २४ उमेदवारी अर्जांपैकी दोन उमेदवारी अर्ज अवैध ठरले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विराज नाईक व भाजपचे हणमंतराव पाटील यांनी पर्यायी अर्ज दाखल केले होते. हे दोन्ही अर्ज अवैध ठरले. १६ उमेदवारांचे २२ अर्ज वैध झाले आहेत.खानापूरमध्ये ३७ अर्जांपैकी दोन उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैध ठरले. त्यामुळे ३५ उमेदवारी अर्ज वैध आहेत. नारायण खरजे (जनहित लोकशाही पार्टी) व प्रल्हाद गुजले (रिपब्लिकन बहुजन सेना) या दोन उमेदवारांचे अर्ज अवैध झाले.तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघात तीन उमेदवारांचे सहा अर्ज अवैध ठरले, तर उर्वरित ३३ उमेदवारांचे ३९ अर्ज वैध ठरले.इस्लामपूर मतदारसंघात २१ उमेदवारांच्या २३ अर्जांची छाननी झाली. निशिकांत पाटील यांनी भाजपकडून भरलेल्या अर्जाला एबी फॉर्म नसल्याने तो अवैध ठरला. त्यांचा दुसरा राष्ट्रवादी पक्षाचा अर्ज वैध ठरला आहे. छाननीनंतर एकूण २२ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहे.पलूस-कडेगाव मतदारसंघात २० उमेदवारांनी २४ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ते सर्व अर्ज वैध झाले आहेत.

समान नाव व चिन्हे घेण्याची खेळी..राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे मानसिंगराव नाईक यांचे तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह आहे. मात्र राजकीय खेळी करत कापूरवाडी (ता. हातकणंगले) येथील मानसिंग ईश्वर नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे. त्यांनी तुतारी चिन्हांची पहिल्या क्रमांकावर पसंती मागितली आहे. अशा पद्धतीने राजकीय खेळी होत असल्याचे अर्जावरून दिसून येत आहे.

सांगलीत जयश्रीताई यांच्यासह पाच अर्ज अवैधसांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्रीताई पाटील व विरेंद्र सिंह पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडून दाखल केलेल्या अर्जाला एबी फॉर्म नसल्यामुळे अवैध झाले. पण त्यांचे अपक्ष अर्ज वैध आहेत. अल्लाउद्दीन काझी, प्रकाश बिरजे, जयश्री अशोक पाटील असे पाच अर्ज अवैध झाले आहेत.

अवैध अर्जाची मतदारसंघनिहाय संख्यामतदारसंघ - अवैध अर्ज 

  • मिरज - ५
  • सांगली - ५
  • इस्लामपूर - १
  • शिराळा - २
  • पलूस-कडेगाव - ०
  • खानापूर - २
  • तासगाव-क.महांकाळ - ६
  • जत - ३
  • एकूण - २४
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीmiraj-acमिरजwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024