शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

यादी बनविली : जामीन रद्दच्या हालचाली; तडीपारीचा पुन्हा प्रस्ताव

By admin | Updated: December 19, 2014 23:52 IST

या गुन्हेगारांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने

सांगली : खून, खुनाचा प्रयत्न यासह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सांगलीतील ५४ गुन्हेगारांची यादी बनविण्यात आली आहे. यातील अनेक गुन्हेगार जामिनावर बाहेर आले आहेत, तर काहींची तडीपार कारवाईची मुदत संपली आहे. या गुन्हेगारांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी त्यांच्यावर ‘वॉच’ ठेवण्याचे आदेश गुन्हे प्रगटीकरण (डीबी) शाखेच्या पथकाला दिले आहेत. पोलीसप्रमुख सावंत म्हणाले की, गुंड बाळू भोकरे, छोट्या ऊर्फ विक्रांत बाबर, सचिन ऊर्फ टारझन जाधव, गणेश भोसले, मिणच्या गवळी, कुणाल गालिंदे, पप्पू फाकडे, राहुल माने, सुनील भोसले, रियाज अपराध, बंड्या केंगार यांच्यासह ५४ गुन्हेगारांची यादी बनविण्यात आली आहे. या गुन्हेगारांकडून शहरात सातत्याने गुन्हे घडले आहेत. यातून अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दाखल असलेले खटले प्रलंबित आहेत. यातील काही गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले होते, तर काहीजण जामिनावर बाहेर आले आहेत. जे जामिनावर आहेत, त्यांचे जामीन रद्द करावेत, अशी न्यायालयात विनंती केली जाणार आहे.सावंत म्हणाले की, सध्या हे गुन्हेगार काय करतात, त्यांची उठ-बस कुठे असते, त्यांचे साथीदार कोण, त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे साधन काय, याची सर्व माहिती घेण्याचे आदेश सांगली शहर व विश्रामबाग ठाण्यातील डीबी पथकाला दिले आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची सूचना केली आहे. खून, खुनाचा प्रयत्न व दरोड्याच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर पोलिसांतर्फे बाजू मांडण्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली आहे. या गुन्हेगारांना जामीन कसा मिळाला? तपास अधिकारी सुनावणीवेळी हजर होते का? याची सर्व माहिती घेण्याचे आदेश पथकाला दिले आहेत. गुन्हेगारांविरुद्ध तक्रार आली, तर त्यांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याची सूचना केली आहे. सच्या टारझन याचा जामीन रद्द करण्याची न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. गुंड महंमद ऊर्फ म्हमद्या नदाफ, बंड्या ऊर्फ बंडोपंत दडगे, मध्या ऊर्फ मधुकर वाघमोडे हे गुन्हेगार कारागृहात आहेत, असेही सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी) कारागृहात सुटला अन...सावंत म्हणाले की, अनेकदा सांगली न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर गुन्हेगार मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळवितात. याची पोलिसांना माहिती मिळत नाही. त्यामुळे आता कारागृहात जामिनावर बाहेर येणाऱ्या गुन्हेगारांची यादी काढण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषणला दिले आहेत. जामिनावर कारागृहातून बाहेर आला की, त्याला ताब्यात घ्यायचे. त्याच्या हाताचे ठसे घेऊन, तो कुठे जाणार आहे, याची चौकशी करुनच त्याला सोडून देण्याचे आदेश दिले आहेत. तो कुठे आहे? काय करतो? याची माहिती आठवड्यातून किमान एकदा तरी घेण्याची सूचनाही केली आहे.