शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालयांना करंट खाते उघडण्याची सक्ती ?

By admin | Updated: August 26, 2015 23:10 IST

सार्वजनिक ग्रंथालयांचे दर्जानिहाय ‘अ, ब, क, ड’ असे वर्गीकरण शासनाने केले आहे. त्यांना शासनाकडून अनुदान नाममात्र दिले जाते.

 माधवनगर : भारतीय स्टेट बॅँकेने शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे बचत खाते बंद करून करंट खाते उघडण्यासाठी सक्ती केली आहे. हा निर्णय ग्रंथालयांसाठी मारक असून ग्रंथालयांना व्यापारी निकष लावून जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळ संपविण्याचा घाट घातला जात आहे. शासनाने हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी सांगली जिल्हा ग्रंथालय विकास संघाने केली आहे. जिल्ह्यातील ग्रंथालये, सार्वजनिक वाचनालये यांना भारतीय स्टेट बॅँकेच्या विविध शाखेकडून बचत खाते बंद करून त्याऐवजी व्यापारी निकष लावत करंट खाते उघडण्याची सक्ती केली आहे. करंट खात्यावर किमान १५ हजार रुपये कायमस्वरूपी शिल्लक ठेवावी लागणार आहे. वार्षिक सेवा शुल्कापोटी किमान तीन हजार रुपयांची वार्षिक कपात आकारली जाणार आहे. सार्वजनिक ग्रंथालयांचे दर्जानिहाय ‘अ, ब, क, ड’ असे वर्गीकरण शासनाने केले आहे. त्यांना शासनाकडून अनुदान नाममात्र दिले जाते. तेही वर्षातून विभागणी करून अनियमितपणे टक्केवारीवर हे अनुदान मिळते. ग्रंथालयांची अवस्था सध्या मरणासन्न आहे. ड वर्ग ग्रंथालयांना शासन अनियमितपणे वार्षिक ३० हजार अनुदान देते. त्यातील पन्नास टक्के रक्कम वेतनावर खर्च करावी, असा शासनआदेश असताना, स्टेट बॅँकेच्या नव्या नियमाने करंट खात्यावर १५ हजार रुपये शिल्लक ठेवणार, की ग्रंथालय चालविणार?, हा प्रश्न आहे. २००८ पूर्वी ग्रंथालय संचालकांकडून धनादेश स्वरुपात अनुदान दिले जात होते, पण ३० एप्रिल २००८ च्या पत्रानुसार कोअर बॅँकिंग प्रणालीद्वारे भारतीय स्टेट बॅँकेत खाते प्रत्येक ग्रंथालयाने उघडावे, असा आदेश देण्यात आला. त्यानुसार राज्यातील सर्व ग्रंथालये कोअर बॅँकिंग प्रणालीने ग्रंथालय संचालकांशी सध्या संलग्न आहेत. त्यामुळे शासकीय अनुदान आॅनलाईन प्राप्त होते. भारतीय स्टेट बॅँकेने १ आॅगस्ट २०१५ पासून ही सर्व खाती करंट खाती करण्याचे आदेश काढले आहेत. मुळात मराठवाड्यातील स्टेट बॅँक आॅफ हैदराबादमध्ये बचत व करंट खात्याकरिता ५०० रुपये आकारणी, तर स्टेट बॅँकेत १५ हजारापर्यंतची सक्ती का होते? एक तर बॅँकेने वरील आदेश मागे घ्यावेत, अन्यथा ग्रंथालय संचालकांनी अन्य कोअर बॅँकिंग प्रणाली असणाऱ्या बॅँकांमध्ये बचत खाते उघडण्यास सहमती द्यावी, अशी मागणी अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष विजय बक्षी, सचिव सुनीलदत्त पाटील यांनी केली. ग्रंथालयांवर अन्याय करणारा हा निर्णय रद्द न झाल्यास आंदोलन उभे करण्याचा इशाराही पत्रकात दिला आहे. (वार्ताहर)