शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

नेते कुठेही गेले, तरी शेवटी कॉँग्रेसच्याच दावणीला येणार

By admin | Updated: July 27, 2015 00:30 IST

पतंगराव कदम : मदन पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

सांगली : पक्ष सोडून कोणी कुठेही गेले तरी, शेवटी त्यांना कॉँग्रेसच्या दावणीलाच यावे लागेल. आजवर किती आले आणि किती गेले तरी, कॉँग्रेस अभेद्य आहे, असे मत आ. पतंगराव कदम यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. अप्रत्यक्षरित्या त्यांनी मदन पाटील यांना टोला लगावला. मदन पाटील यांच्याविषयी ते म्हणाले, कोणी कुठे जावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कॉँग्रेसला अनुभव नवा नाही. आजवर अनेकजण पक्षातून गेले, पण पुन्हा त्यांना कॉँग्रेसच्याच दावणीला यावे लागले. आम्हीही याकडे लक्ष देत नाही. बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही समविचारी लोकांना एकत्रित घेऊन निवडणूक लढत आहोत. राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत, त्यात सांगलीच्या बाजार समितीचा समावेश होतो. त्यामुळे या बाजार समितीवर सत्ता प्रस्थापित करणे आमचे लक्ष्य असेल. आम्ही बाजार समितीचा कायापालट करू. महापालिकेप्रमाणेच बाजार समितीमध्येही आपण लक्ष घालणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही सरकारांचा कारभार चांगला नाही. लोकांमधून त्यांच्याविषयी नाराजी आहे. भलेही आमचे सरकार अधिक काळ सत्तेवर होते, पण त्यांनी वर्षभरात काही गोष्टी करण्याची आश्वासने जनतेला दिली होती, त्याचे काय? जनता त्यांना त्या गोष्टीचा हिशेब मागणारच आहे. साखर कारखानदारीबद्दलही शासनाची उदासीनता दिसत आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर, पुढील हंगामात कारखाने सुरू होतील की नाही, याची शंका आहे. (प्रतिनिधी)बदलत्या समीकरणाची नांदीबाजार समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणात काही बदल झाले आहेत. हे जिल्ह्याच्या भविष्यातील बदलाची नांदी आहे, असे मत पतंगराव कदम यांनी व्यक्त केले. एकत्र यायला हवेजिल्हास्तरावरील निवडणुकांमध्ये कॉँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित येणे गरजेचे आहे, मात्र आजवर सांगली जिल्ह्यात अशा गोष्टी अपवादानेच घडल्या, असे मत कदम यांनी व्यक्त केले. ते नेत्यांचे पॅनेलजयंतरावांच्या पॅनेल म्हणजे नेत्यांचे पॅनेल आहे. कार्यकर्त्यांना आम्ही महत्त्व देतो. त्यामुळे आमचे पॅनेल हे कार्यकर्त्यांचे पॅनेल आहे, अशी टीका पतंगरावांनी केली. राणेंना आक्रमकता अपेक्षितनारायण राणे यांनी काँग्रेसच्याबाबतीत व्यक्त केलेले मत त्यांचे व्यक्तिगत मत आहे. तरीही विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी यापूर्वी आक्रमकतेने काम केले आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेसकडून अधिक आक्रमकता अपेक्षित आहे, असे मत कदम यांनी व्यक्त केले.