कुंडलला मिळणार २४ तास पिण्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:28 IST2021-09-25T04:28:25+5:302021-09-25T04:28:25+5:30

पलूस : सगळीकडे पाण्याचे राजकारण सुरू असताना पलूस तालुक्यातील कुंडलगाव पिण्याच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्य ...

Kundal will get drinking water for 24 hours | कुंडलला मिळणार २४ तास पिण्याचे पाणी

कुंडलला मिळणार २४ तास पिण्याचे पाणी

पलूस : सगळीकडे पाण्याचे राजकारण सुरू असताना पलूस तालुक्यातील कुंडलगाव पिण्याच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी केलेल्या भगीरथ प्रयत्नांना यश आले आहे.

कुंडलला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून जलजीवन मिशन कार्यक्रमातून ५ कोटी २५ लाख रुपये पिण्याच्या पाणीयोजनेसाठी मंजूर झाले होते. यातून नदीवर अत्याधुनिक असे जॅकवेल, इंटेकवेल, पंपसेट बसवण्यात येणार आहेत. गावात अंतर्गत २६ किलोमीटर पाइपलाइन मंजूर होती. आता ती वाढून ४१ किलोमीटर होणार आहे. या योजनेत वाडीवस्त्यांवर पाणी मिळावे म्हणून वाढीव तरतुदीसाठी प्रयत्न सुरू होते. जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी या मागणीची दखल घेऊन एक कोटी ७० लाखांचा वाढीव निधी मंजूर केला. यामुळे गावात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होईल. या योजनेचे प्रत्यक्ष काम लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी दिली.

ते म्हणाले की, परिसरातील गावांच्या तुलनेत कुंडल हे गाव पाण्याच्या बाबतीत यापुढे स्वयंपूर्ण होईल. गावात २४ तास पाणी आले तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. या माध्यमातून क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड यांच्या स्वप्नातील योजनेला पूर्णत्वास नेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Web Title: Kundal will get drinking water for 24 hours