शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिवीरांची महती पश्चिम महाराष्ट्रातच राहिली

By admin | Updated: March 23, 2015 00:43 IST

उज्ज्वल निकम : तृतीय स्मृतिदिनानिमित्त नागनाथअण्णांना वाळवा येथे आदरांजली

वाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा, क्रांतिसिंह नाना पाटील यांची महती पश्चिम महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली. योग्यपद्धतीने हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशपातळीवर मांडणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम विशेष सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केले.हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्यावतीने आयोजित क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या तृतीय स्मृतिदिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत, माजी सहकारमंत्री प्रा. डॉ. एन. डी. पाटील होते. व्यासपीठावर संकुलाच्या मार्गदर्शिका कुसूमताई नायकवडी, कार्यक्रमाचे निमंत्रक वैभव नायकवडी, अ‍ॅड. अनिकेत उज्ज्वल निकम, प्रतापसिंह जाधव उपस्थित होते.अ‍ॅड. उज्ज्वल निकम म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात स्वातंत्र्याची धगधगती मशाल क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनीच पेटविली. परंतु आजही नाना पाटील व क्रांतिसिंह डॉ. नागनाथअण्णा पश्चिम महाराष्ट्रापुरतेच मर्यादित आहेत. ते नागपूरला माहिती नाहीत. ते साऱ्या देशाला माहिती झाले पाहिजेत. तरच त्यांनी दीन-दलित, उपेक्षित, शोषित, पीडित, शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी यांच्यासाठी केलेले काम सगळ्यांना समजेल. माझी आई विमलाताई आणि क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा एकाच शाळेत शिक्षण घेत होते. पुढे माझी आईसुध्दा क्रांतिकारी लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांना मदत करू लागली. माझ्या आईच्या तोंडून बालपणापासूनच स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचा इतिहास ऐकून व पुढे तो वाचून मला आजच्या गुंडांविरुध्द लढण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. आज तरुणांना गुन्हेगारीचे आकर्षण वाटू लागले आहे. समाजमनात वाढलेले हे गुन्हेगारीचे आकर्षण दूर केले पाहिजे.
यावेळी कुसूमताई नायकवडी म्हणाल्या की, शेतकऱ्यांची मुले- बाळे भिक्षुकासारखी दुसऱ्याच्या दारात उभी आहेत. तरी आपले सरकार डोळे उघडून मदत देण्यास तयार नाही.
प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, गेल्या दहा वर्षात देशातील तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पुरोगामी म्हणून ढोल वाजवणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातील ६३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे.
निमंत्रक वैभव नायकवडी यांनी स्वागत केले. यावेळी नायकवडी म्हणाले, अवकाळी पाऊस, ऊस दराचे एफआरपी, त्यातच साखर धंदा अडचणीचा, त्यामुळे शेतकरी जगतोय की मरतोय, हे कळेनासे झाले आहे.
सभेपूर्वी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी इनडोअर स्पोर्टस् हॉलचे उद्घाटन निकम यांच्याहस्ते करण्यात आले. मान्यवरांनी समाधीस्थळी पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. नागनाथअण्णांच्या स्मारकासाठी शिराळा तालुक्यातील चरणच्या सरपंच सोनाली बाळासाहेब नायकवडी यांनी एक लाख रुपयांचा धनादेश वैभव नायकवडी यांच्याकडे सुपूर्द केला.
सभेला गौरव नायकवडी, अपर्णा साळुंखे, सोनाली नायकवडी, प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, नंदिनी नायकवडी, किरण नायकवडी, भगवान पाटील, जयवंत अहिर, एन. एम. मंडलिक उपस्थित होते. (वार्ताहर)