शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

पतंगरावांनी पैशाचा वापर केला

By admin | Updated: May 17, 2015 01:19 IST

विलासराव जगताप : सर्वसाधारण गटात चिंध्या कशा झाल्या?

सांगली : जिल्हा बँक निवडणुकीत मर्यादित मतदारसंख्या असलेल्या सोसायटी गटात पैशाच्या बळावर मते फिरवता येतात, म्हणून पतंगराव कदम यांनी केवळ ‘अ’ गटातच लक्ष घातले. त्याठिकाणी पैशाचा वापर करून त्यांनी काही जागा जिंकल्या, असा आरोप भाजपचे आ. विलासराव जगताप यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना केला. ते म्हणाले की, पतंगरावांचे राजकारण पै-पाहुण्यांच्या पलिकडे कधी गेले नाही. जिल्हा बँक निवडणुकीत त्यांचेच नातेवाईक सोसायटी गटातून उमेदवार होते. त्यामुळे त्यांनी धनशक्ती पणाला लावली. दुसरे कोणी उमेदवार असते, तर त्यांनी इतकी मेहनत घेतली नसती. नात्यातील लोकांसाठी त्यांनी जनसुराज्य व राष्ट्रवादीची मते पैशाच्या जोरावर फोडली. पतंगरावांना ‘जनसुराज्य’चे नेते विनय कोरे यांच्या भेटीसाठी लाचार व्हावे लागले. पैशासाठी मतदारांना लाचार करताना तेसुद्धा लाचार झाले. या गोष्टीतच आमचे यश आहे. वैयक्तिक सूडभावनेतून त्यांनी आजवर राजकारण केले आहे. जत तालुक्यातील पतंगरावांच्या गटाचे नेते कमकुवत आहेत. यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये विक्रम सावंत यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे सोसायटी गटातील या विजयाने जग जिंकल्याचा किंवा आकाश हाताला आल्याचा आव त्यांनी आणू नये. पतंगरावांच्या लोकांनी लोकशाही मार्गाने कोणत्याही दबावतंत्राचा, पैशाचा वापर न करता निवडणूक जिंकली असती, तर त्यांच्या विजयाचे कौतुक केले असते. पण, आजवर त्यांचे राजकारण सरळमार्गाने कधीही झालेले नाही. पैशाच्या जोरावरच पतंगराव राजकारण करीत असतात. भारती विद्यापीठ, हॉस्पिटल व बाजारासाठी त्यांनी अनेक ठिकाणच्या मोक्याच्या जागा बळकावल्या. विद्यापीठ व अन्य संस्थांसाठी ज्या जागा त्यांनी घेतल्या, त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे केली आहे. आगामी अधिवेशनातही जागांच्या या गंभीर प्रश्नावर आवाज उठविणार आहे, असे आ. जगताप यांनी सांगितले. त्यांच्याच चिंध्या झाल्या पतंगरावांनी सुरुवातीपासूनच जिल्हा बॅँक निवडणुकीत लक्ष घातले होते. मर्यादित मतदारसंख्या असलेल्या सोसायटी गटातच त्यांनी लक्ष घातले. ही मते पैशाच्या बळावर फोडणे शक्य होते. अन्य सर्वसाधारण गटात मतदारसंख्या अधिक असल्याने तेथे त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे त्याठिकाणी त्यांच्याच पॅनेलच्या चिंध्या झाल्या. त्यांनी दुसऱ्याच्या चिंध्या करण्याची भाषा करू नये, असे मत जगताप यांनी व्यक्त केले.