शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
3
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
4
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
5
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
6
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
7
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
8
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
9
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
10
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
11
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
12
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
13
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
14
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
15
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
16
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
17
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
18
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
19
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पंचायत समिती उमेदवारी अर्जासाठी मागितली लाच, महसूल सहायकाला रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:10 IST

कवठेमहांकाळ : पंचायत समितीच्या नामांकन फॉर्मसाठी २०० रुपयांची लाच घेताना कवठेमहांकाळ तहसीलदार कार्यालयातील महसूल सहायकाला बुधवारी रंगेहाथ पकडले. सुभाष ...

कवठेमहांकाळ : पंचायत समितीच्या नामांकन फॉर्मसाठी २०० रुपयांची लाच घेताना कवठेमहांकाळ तहसीलदार कार्यालयातील महसूल सहायकाला बुधवारी रंगेहाथ पकडले. सुभाष बाबासाहेब पाटील (वय ५४, रा. इरळी, ता. कवठेमहांकाळ) असे त्याचे नाव असून त्याच्यावर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

तक्रारदार त्यांच्या पत्नीच्या नावे पंचायत समिती निवडणुकीचे नामांकन फॉर्म घ्यायला तहसील कार्यालय, कवठेमहांकाळ येथे गेले होते. तक्रारदारांनी मंगळवारी तहसील कार्यालयात जाऊन नामांकन फॉर्म वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे चौकशी केली असता, त्याने प्रत्येक फॉर्मसाठी १०० रुपये दिले पाहिजेत, असे सांगितले.

वाचा: सांगलीत भाजपची वेगळी रणनीती; वाळव्यात युती, अन्यत्र स्वबळाचा नारा

तक्रारदारांनी विचारले की, त्या १०० रुपयांची पावती दिली जाईल का? यावर कर्मचाऱ्याने कोणतीही पावती दिली जात नसल्याचे सांगितले. तो कर्मचारी प्रत्येक उमेदवाराकडून प्रत्येक नामांकन फॉर्मसाठी १०० रुपये घेत होता, परंतु पावती आणि नोंद न घेता ती रक्कम लाच स्वरूपात स्वीकारत होता. तक्रारदारांनी बुधवारी याबाबत तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारावर तहसील कार्यालयात पडताळणी केली असता, सुभाष पाटील (महसूल सहायक) यांनी तक्रारदारांच्या पत्नीच्या नावावर पंचायत समिती निवडणुकीचे दोन नामांकन फॉर्म देण्यासाठी प्रत्येकी १०० रुपये प्रमाणे २०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांकडून २०० रुपये लाच स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपाधीक्षक यास्मिन इनामदार, पोलिस निरीक्षक किशोरकुमार खाडे, पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण, पोलिस अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, सुदर्शन पाटील, सीमा माने, सागर नायकुडे यांच्या पथकाने केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Revenue Assistant Caught Red-Handed Taking Bribe for Nomination Form

Web Summary : In Sangli, a revenue assistant was arrested for accepting a ₹200 bribe for Panchayat Samiti nomination forms. The Anti-Corruption Bureau caught him red-handed after a complaint was filed regarding illegal fees for forms without receipts.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६SangliसांगलीZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५Bribe Caseलाच प्रकरण