शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कवलापूरकरांच्या नशिबी पळापळच

By admin | Updated: November 18, 2014 23:26 IST

कूपनलिकांचा आधार : साथीच्या आजारांची ग्रामस्थांना भीती

सांगली : माधवनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना आर्थिक संकटात सापडल्याने, कवलापूर (ता. मिरज) या गावातील ग्रामस्थांच्या नशिबी पाण्यासाठीची पळापळ ही पूजलेलीच आहे. गेल्या दहा दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरु आहे. सध्या कूपनलिकांचा आधार असला तरी, हे पाणी पिण्यास योग्य नसल्याने यातून साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.सांगलीच्या कृष्णा नदीपासून दहा किलोमीटरवर असलेले कवलापूर गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी तहानलेले आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे दहा लाखांचे बक्षीस गावाने पटकाविले आहे. मात्र पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणच पुढाकार घेत नाही. ग्रामपंचायतीची पाणीपट्टी वसूल करणारी यंत्रणा सक्षम नाही. ग्रामस्थ कामानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात आल्यानंतरच पाणीपट्टी वसुली केली जाते. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने वसुलीसाठी दररोज घरोघरी जाणे होत नाही. सध्या गावातून पाणीपट्टीची रक्कम किती वसूल होते, त्यावरच पाणी दिले जाते. महिन्यातून केवळ सहावेळा पाणी सोडले जाते. यामध्येही कुठे गळती निर्माण झाली, तर चारच वेळा पाणी येते. पाणीपट्टी वसुलीत शिस्तबद्धपणा आला, शंभर टक्के वसुली झाली, तरच दररोज पाणी सोडण्यासाठी ग्रामपंचायतीची तयारी आहे. यासाठी ग्रामपंचायत सदस्य, गावातील स्थानिक पुढाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. परंतु पाण्याच्या प्रश्नावर कोणीही एकत्र येताना दिसत नाही. पाणी वेळेवर सोडण्यात येत नसल्याने ग्रामस्थही पाणीपट्टी भरण्यास पुढे येत नाहीत. वर्षानुवर्षे पाण्याचा हा प्रश्न प्रलंबितच आहे. गावात कूपनलिका आहेत, मात्र ते पाणी पिण्यास योग्य नसले तरी ग्रामस्थांना पर्याय नाही. (प्रतिनिधी)