शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

आष्ट्याची वाटचाल ‘निर्मल’ शहराकडे

By admin | Updated: November 22, 2014 00:02 IST

२२५० शौचालये पूर्ण : दोन कोटी ६५ लाखांची योजना

सुरेंद्र शिराळकर-आष्टा शहरात २ कोटी ६५ लाख रुपये खर्चाची एकात्मिक शौचालय योजना राबिवण्यात येत आहे. केंद्र शासन ७५ टक्के, राज्य शासन १५ टक्के व लाभार्थी १० टक्के खर्चून शहरात सुमारे २६५० शौचालये बांधण्यात येत आहेत. सुमारे २२५० शौचालये बांधून पूर्ण झाली असून, लवकरच आष्टा शहर हागणदारीमुक्त होणार आहे.आष्टा पालिकेने २००४ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात ‘क’ वर्गात पालिका गटातून दुसरा क्रमांक पटकाविला होता. पालिकेस १० लाखांचे बक्षीस मिळाले होते. शहराच्या विकासासाठी विविध योजना मंजूर झाल्या. त्यापैकीच एकात्मिक कमी खर्चाची शौचालय योजना (आयएलसीएसएल) मंजूर झाली. राज्यात फक्त अमरावती व आष्टा पालिकेस ही योजना मंजूर झाली आहे. प्रत्येक कुटुंबास केवळ २२०० रुपयात शौचालय बांधून मिळाले आहे. केंद्र व राज्य शासन ९ हजार व लाभार्थी २२०० रुपये अशी ही योजना होती.आजअखेर सुमारे २२५० शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. परंतु उर्वरित ४०० कुटुंबप्रमुखांनी शौचालय मंजूर असूनसुध्दा त्याचा लाभ घेतलेला नाही. अशा ४०० नागरिकांना जादा रक्कम द्यावी लागणार आहे. सध्या ११ हजार २०० रुपयांऐवजी १५ हजारात शौचालय बांधून मिळणार आहे. शहरातील उर्वरित शौचालयांचे बांधकाम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याने आष्टा पालिका ही राज्यातील पहिली हागणदारीमुक्त नगरपालिका होणार आहे.नगराध्यक्षा सौ. मंगलादेवी शिंदे म्हणाल्या, शहरात २६५० शौचालये बांधण्यात येत आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरातील सार्वजनिक शौचालये लवकरच पाडण्यात येणार आहेत. या सर्व नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. त्यांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे. शौचालय नसणाऱ्या कुटुंबांना जागा नसल्यास जागा उपलब्ध करून योजनेचा लाभ दिला जाणार आहे.२६५0 अर्ज मंजूरआष्टा शहराची लोकसंख्या ५० हजारांच्या घरात आहे. अनेक नागरिकांकडे वैयक्तिक शौचालयाची सुविधा आहे. परंतु मुख्य शहरासह उपनगरे, वाड्या-वस्त्यांवर शौचालयेच नव्हती. अशा शहरातील सर्व कुटुंबांना एक शौचालय देण्यासाठी पालिकेने घरोघरी फिरुन जनजागृती केली. स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. सुमारे २६५० कुटुंबप्रमुखांचे अर्ज पालिकेने मंजूर केले.