विरोधी पक्षनेता निवडीचे अधिकार जयंतरावांना!

By Admin | Updated: December 22, 2016 23:43 IST2016-12-22T23:43:14+5:302016-12-22T23:43:14+5:30

दोन दिवसात निर्णय : राष्ट्रवादीतील सहाजण इच्छुक

Jayantarawane has the right to choose the Leader of the Opposition! | विरोधी पक्षनेता निवडीचे अधिकार जयंतरावांना!

विरोधी पक्षनेता निवडीचे अधिकार जयंतरावांना!

ंगली : महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्यावर सोपविण्यात आला. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जयंत पाटील घेतील तो निर्णय मान्य करण्याचे आश्वासनही नगरसेवकांनी बैठकीत दिले. विरोधी पक्षनेतेपदासाठी विष्णू माने, राजू गवळी, शेडजी मोहिते, युवराज गायकवाड, मैनुद्दीन बागवान, शुभांगी देवमाने यांनी दावा केला आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला स्थायी समितीच्या सभापती संगीता हारगे, मावळते विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, विष्णू माने, राजू गवळी, युवराज गायकवाड, शेडजी मोहिते यांच्यासह पक्षाचे बहुतांश नगरसेवक उपस्थित होते. दिग्विजय सूर्यवंशी यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा महापौर हारुण शिकलगार यांच्याकडे सोपविला आहे. गेली साडेतीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. दोन दिवसांपूर्वी आमदार जयंत पाटील यांनी दूरध्वनीवरून सूर्यवंशी यांना राजीनाम्याचे आदेश दिले होते. अचानक घडलेल्या या घडामोडीमुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती. सूर्यवंशी यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून पक्षाअंतर्गत हालचाली सुरू होत्या. जयंत पाटील यांनी बदल करण्याचे आश्वासनही दिले होते, पण जसजसा कालावधी वाढू लागला, तसे इच्छुकांत निराशाही पसरली होती. गुरुवारी झालेल्या बैठकीत सर्वच नगरसेवकांची मते आजमाविण्यात आली. सर्वच नगरसेवकांनी विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड करायची, याचे अधिकार जयंत पाटील यांना दिले. त्यांचा निर्णय सर्वमान्य असेल. बैठकीत सहाजणांनी पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांची नावे जयंत पाटील यांना कळविली जातील, असे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी सांगितले. (प्रतिनिधी)बैठकीला तिघे गैरहजरमहापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ व सहा सहयोगी असे २५ सदस्य आहेत. यापैकी सहयोगी सदस्य धनपाल खोत, सुलोचना खोत, अनिता आलदर हे तीन सदस्य गैरहजर होते, तर सध्या उपमहापौर गटात सहभागी असलेल्या शुभांगी देवमाने यांनी मात्र बैठकीला हजेरी लावली होती. शेडजी मोहिते, गवळींनी घेतली भेटइच्छुक शेडजी मोहिते, राजू गवळी यांनी सांयकाळी इस्लामपूर येथे जयंत पाटील यांची भेट घेतली. १८ नगरसेवकांनी शेडजी मोहिते यांच्या नावाला पसंती दर्शविली आहे. येत्या दोन दिवसांत विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा करू, असे आ. पाटील यांनी सांगितले. शुक्रवारी जयंत पाटील सांगलीत येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत इतर इच्छुक त्यांना भेटून साकडे घालण्याची शक्यता आहे.

Web Title: Jayantarawane has the right to choose the Leader of the Opposition!