शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली आंदोलनाबाबत जयंतरावांकडून हिंसेचे समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST

इस्लामपूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलक आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये जे चालले आहे, त्यात जलसंपदामंत्री जयंत पाटील हिंसेचे समर्थन करत ...

इस्लामपूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलक आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये जे चालले आहे, त्यात जलसंपदामंत्री जयंत पाटील हिंसेचे समर्थन करत आहेत. भाजप सरकारवर आरोप करून लोकांना भडकवले जात आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली.

येथे भाजप आणि रयत क्रांती आघाडीच्या असंघटित बांधकाम कामगार मेळाव्यासाठी ते आले होते. मेळावा झाल्यानंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सामान्य नागरिकही हिंसेचे समर्थन करणार नाही. मात्र मंत्री असूनही जयंत पाटील हिंसेचे समर्थन करतात. आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांचा समावेश असल्याच्या कथा रचल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या नावाखाली हिंसेवर विश्वास असणारे लोक या आंदोलनात उतरले आहेत. त्याचमुळे हिंसाचार झाला. संपूर्ण जगाने ही घटना माध्यमातून पाहिली आहे.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकरी आंदोलकांशी नऊवेळा चर्चा केली. त्यातून खूप गोष्टी मान्य झाल्या होत्या. केंद्राने कृषी कायद्याची अंमलबजावणी थांबवण्याची तयारी दाखवत समिती नेमून यावर मार्ग काढू अशी भूमिका घेतली होती. यापेक्षा आणखी काय करायला हवे होते? हिंसेचे समर्थन न करता आंदोलने झाली पाहिजेत.

पाटील म्हणाले की, कोरोनाच्या काळात भीतीमुळे घरी बंदिस्त राहिलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता प्रासंगिक बाहेर दिसू लागले आहेत. मराठा आरक्षण, इतर मागास प्रवर्ग आणि इतर बरेच प्रश्न आहेत. मात्र मंत्र्यांमध्ये कोणताही ताळमेळ नाही. कोरोनाकाळात शेतकरी, कामगार किंवा ज्यांना आवश्यकता आहे, अशा घटकांना राज्य सरकारची कसलीही मदत मिळाली नाही. हे सर्व घटक रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही.