शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर येथे उद्या जनसंकल्प बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र प्राधान्याने खानापूर येथेच व्हावे या मागणीला गती देण्यासाठी खानापूर येथे उद्या, शनिवारी खानापूर घाटमाथा ...

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र प्राधान्याने खानापूर येथेच व्हावे या मागणीला गती देण्यासाठी खानापूर येथे उद्या, शनिवारी खानापूर घाटमाथा व परिसरातील लोकांसाठी जनसंकल्प बैठकीचे आयोजन केल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस गोपीनाथ सूर्यवंशी यांनी दिली.

ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्याबाबत समिती नियुक्त केली होती. या समितीने खानापूर येथे जागेची पाहणी केली. त्यावेळी पाच ते सहा तालुक्यांचा हा मध्यवर्ती तालुका आहे व उपकेंद्रासाठी लागणारे सर्व निकष (महामार्ग, जमीन, पाझर तलाव पाणी) हे सर्व खानापूर येथे उपलब्ध असल्याने उपकेंद्र खानापूर येथेच उपकेंद्र होण्यास अनुकूलता दर्शविली होती.

परंतु, कालांतराने उपकेंद्राची मागणी मागे पडली व त्यात काही राजकीय मंडळींनी हस्तक्षेप करून खानापूर येथे होणारे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव किंवा सांगली येथे होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे खानापूरकरांवर अन्याय होत आहे. परिणामी, उपकेंद्र खानापूर येथेच होण्यासाठी घाटमाथ्यावर नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरविण्यासाठी खानापूर येथे शनिवारी दुपारी चार वाजता जनसंकल्प बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य व बळवंत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जी. एन. मुळीक मार्गदर्शन करणार असल्याचे गोपीनाथ सूर्यवंशी यांनी सांगितले.