शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात विरोधकांच्या डोळ्यात नेहमी कावीळच!

By admin | Updated: September 7, 2015 22:54 IST

खंडेराव जाधव : विकासात अडथळे आणण्याचा धंदा

इस्लामपूर : इस्लामपूर पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय कुंभार आणि काँग्रेसचे वैभव पवार, विजय पवार यांची अवस्था कावीळ झाल्यासारखीच आहे. आम्ही करत असलेल्या विकास कामांना हातभार लावण्यापेक्षा त्यामध्ये अडथळे आणण्याचा उद्योग त्यांच्याकडून केला जात आहे, असा टोला नियोजन समितीचे सभापती खंडेराव जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना मारला.जाधव म्हणाले की, इस्लामपूर शहरातील विकास कामांना गती आली आहे. आमचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास सुरु आहे. केंद्रात, राज्यात विरोधकांची सत्ता आहे. परंतु भाजपच्या झेंडा मिरवणाऱ्या विजय कुंभार यांनी इस्लामपूर शहरातील विकासासाठी काय केले? आम्ही केलेल्या कामांमध्ये खोट काढणे एवढेच त्यांनी केले आहे. त्यात त्यांना काँग्रेसच्या वैभव पवार, विजय पवार यांचीही साथ लाभली आहे.पावसाळ्यापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरू केले होते. परंतु ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप वैभव पवार व त्यांचे बंधू विजय पवार यांनी करून कामे बंद पाडली. याला भाजपच्या विजय कुंभार, विक्रम पाटील, नगरसेवक कपिल ओसवाल यांची साथ होती. आमच्यामुळेच शहरातील रस्ते चांगल्या दर्जाचे झाले, असा दावा विरोधकांनी केला आहे, तर सत्ताधाऱ्यांनी रस्ते चांगल्या दर्जाचे होत असताना विरोधक विनाकारण कामात अडथळा आणत होते. विरोधकांच्या या भूमिकेमुळे शहरातील काही रस्ते निधी असतानाही करता आले नाहीत, असा पलटवार त्यांनी केला. शासकीय जागेवर असलेल्या जुन्या खोक्यांच्या जागी पालिकेने नवीन खोकी देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विजय कुंभार यांनी वाढीव घरपट्टीवरही आवाज उठवला होता. यावर सत्ताधाऱ्यांनी मौन पाळले आहे. (वार्ताहर)विरोधक बेदखल---पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी विरोधकांची दखल न घेता खोक्यांचे धूमधडाक्यात उद्घाटन करून चपराक दिली आहे. शहरात मोफत वाय-फायची सेवा नुकतीच कार्यरत झाली आहे.