शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन, पुनर्वसनाचे प्रश्न ‘जैसे थे’च

By admin | Updated: May 1, 2015 00:19 IST

पाणी योजनांसाठी साडेतीन हजार कोटींची गरज : भाजप सरकारकडून तुटपुंज्या निधीची तरतूद

  ढिसाळ नियोजन आणि भ्रष्टाचारामुळे जिल्ह्यातील कृष्णा खोरे प्रकल्पांचे तीन-तेरा वाजले आहेत. टेंभू, ताकारी, म्हैसाळ आणि वाकुर्डे बुद्रुक सिंचन योजनांची कामे गेल्या पंचवीस ते तीस वर्षांत पूर्ण झाली नाहीत. आघाडी सरकारनेही हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची ठोस तरतूद केली नाही. याच सरकारवर टीकेचा भडीमार करून सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना सरकारने तर या योजनांना तुटपुंज्या निधीची तरतूद करून दुष्काळग्रस्तांच्या तोडाला पाने पुसली आहेत. यामुळे अपूर्ण सिंचन योजनांच्या खर्चाचा डोंगर वर्षाला शेकडो कोटींनी वाढत आहे. अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किमान साडेतीन हजार कोटींची गरज आहे. ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा प्रारंभ माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याहस्ते झाला. मात्र २९ वर्षांनंतरही ही योजना अपूर्ण असून, दोन्ही योजनांवर आतापर्यंत १७०० कोटींचा निधी खर्च झाला. दोन्ही योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी दीड हजार कोटींच्या निधीची गरज आहे. ताकारी योजनेतून कडेगाव, तासगाव तालुक्यातील सुमारे साडेसहा हजार एकर क्षेत्राला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाणी मिळत आहे. शेतकरीही पाणीपट्टी भरत असल्यामुळे योजना सुरळीत सुरू आहे. या योजनेचेही मुख्य व जोडकालव्याची २५ टक्के कामे अपूर्ण आहेत. येथील पोटकालव्याची कामे पूर्णत्वाला गेल्यास कडेगाव, तासगाव तालुक्यातील ५५ गावांमधील २४ हजार २९० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. म्हैसाळ योजनेतून मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील ८१ हजार ६९७ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. निधीचे ग्रहण न सुटल्यामुळे ४० टक्के कामे अपूर्ण आहेत. आतापर्यंत ८९६ कोटींचा निधी खर्च झाला आहे. ओढ्या-नाल्यांनी पाणी सोडून १२०१० हेक्टर शेतीला पाणी मिळत असल्याचा अधिकाऱ्यांचा अहवाल आहे. राज्य शासनाने २०१५-१६ च्या अंदाजपत्रकामध्ये म्हैसाळ व ताकारी योजनेसाठी १५२ कोटींच्या निधी मागणी केली होती. त्यापैकी केवळ ८० कोटींचा निधी मिळाला आहे. या तुटपुंज्या निधीतून ठेकेदारांची थकबाकीही भागत नसल्यामुळे योजनांचे भवितव्य अडचणीत सापडले आहे. टेंभू योजनेसमोर तर समस्यांचा डोंगर आहे. या योजनेचा १४१६ कोटी ५९ लाखांचा खर्च ३४०० कोटींवर गेला आहे. १५०० कोटी खर्च झाल्यानंतरही ८० हजार ४७२ हेक्टरपैकी केवळ सात हजार हेक्टरपर्यंत पाणी पोहोचले आहे. तेही कऱ्हाड, कडेगाव, खानापूर तालुक्यातील काही भागालाच मिळते. अनेक संघर्षातून आटपाडी, सांगोला तालुक्यात पाणी मिळाले, पण ओढ्या-नाल्यांद्वारेच. मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणाबरोबरच पोटकालव्यांची कडेगाव, खानापूर, आटपाडी, सांगोला तालुक्यातील बहुतांशी कामे अपूर्णच आहेत. येथील कामे पूर्ण केली तरच शेतकऱ्यांना खऱ्याअर्थाने टेंभू योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणूनच प्रशासनाने २०१५-१६ यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये १८० कोटींच्या निधीची मागणी केली होती. परंतु, सरकारने केवळ ७८ कोटींच्या निधीची तरतूद करून दुष्काळग्रस्तांची निराशा केली आहे. शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक योजना आणि वारणा डावा व उजव्या कालव्याबरोबरच आरफळ योजनांची कामे निधी नसल्याने अपूर्ण आहेत. - अशोक डोंबाळे