शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विटा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना विमा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:23 IST

विटा : विटा शहर व खानापूर तालुक्‍यातील अनेक गावांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काहींचा मृत्यू होत आहे. ...

विटा : विटा शहर व खानापूर तालुक्‍यातील अनेक गावांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काहींचा मृत्यू होत आहे. या सर्व कोरोना मृतदेहावर विटा नगरपालिकेचे कर्मचारी जीवाची बाजी लावून अंत्यसंस्कार करीत आहेत, त्यामुळे स्वतःची व कुटुंबाची काळजी न करता अहोरात्र अंत्यसंस्कारचे काम करणाऱ्या विटा नगरपालिका कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती प्रतिभा चोथे यांनी दिली.

त्या म्हणल्या, विटा नगर परिषदेच्यावतीने योग्य नियोजन करून कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य नगरपालिकेच्यावतीने पुरवले जात आहे. अंत्यसंस्कार ही सामाजिक बांधीलकी पार पाडणारे नगर परिषदेचे कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात जोखमीचे काम जनहित व सेवाभावी वृत्तीने पालिकेचे कोरोना योद्धे करीत आहेत. कोरोनाच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार करण्याचे जोखमीचे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्याचा व भविष्याचा विचार करून त्या सर्वांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे.

नगराध्यक्ष प्रतिभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपनगराध्यक्षा सारिका सपकाळ व मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या सहकार्याने सर्व पथक काम करीत आहे. सध्या लसीकरणाचे काम सुरू आहे. महिलांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही यावेळी सभापती प्रतिभा चोथे यांनी केले.