शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत आईने दोन मुलांना २० हजारांत विकले, नवजात बालिकेच्या विक्रीचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 12:55 IST

याप्रकरणी संबंधित मातेसह पाचजणांविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरज: मातेच्या कुशीत सुरक्षित असणाऱ्या चिमुकल्यांचेच भवितव्य पैशांसाठी विकले गेल्याची धक्कादायक घटना मिरजेत घडली आहे. गरीब मातेने आपल्या दोन व तीन वर्षे वयाच्या दोन मुलांना प्रत्येकी २० हजार रुपयांत विकल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर पाच दिवसांच्या नवजात मुलीलाही विकण्याचा प्रयत्न केल्याची कबुली तिने दिली आहे.

याप्रकरणी संबंधित मातेसह पाचजणांविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्री केलेल्या दोन्ही बालकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मिरजेत पाठक अनाथाश्रमात दाखल केले आहे. मनीषा रोहित जाधव (वय ४१, रा. सुभाषनगर, मिरज) असे या मातेचे नाव आहे. तिचा पती रोहित हा व्यसनाधीन आहे.

कोणताही व्यवसाय किंवा रोजगार नसल्याने हे कुटुंब भीक मागून उदरनिर्वाह करते. फूटपाथवर दिवस काढते. गरिबी, उपासमार व असुरक्षिततेच्या छायेत जगताना या मातेने अखेर आपल्या पोटच्या लेकरांचाच सौदा केला.

दीड वर्षापूर्वी तिने दोन वर्षांच्या मुलाला २० हजार रुपयांच्या सौद्यात विकले. याकामी महापालिकेच्या आरोग्य विभागातील सेविका सुरेखा लोंढे व उमाजी लोंढे यांनी मध्यस्थी केली.

त्यानंतर तीन वर्षाच्या दुसऱ्या बालकाचाही अशाच पद्धतीने सौदा झाला. पोलिसांनी या व्यवहारात मध्यस्थी करणारे उमाजी रमेश लोंढे, सुरेखा लोंढे, तसेच मुलांना विकत घेणारे दशरथ लोंढे व सचिन गोसावी (रा. माधवनगर) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Miraj: Mother Sells Two Children, Attempts to Sell Newborn

Web Summary : In Miraj, a poverty-stricken mother sold her two young children for ₹20,000 each and attempted to sell her newborn. Police arrested five, including the mother and intermediaries, and rescued the children, placing them in an orphanage. Investigation underway.
टॅग्स :miraj-acमिरजCrime Newsगुन्हेगारी