शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकांचा प्रेरणादायी इतिहास दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST

सावंतपूर : इंग्रजांशी सतत चौदा वर्षे प्राणपणाने लढा देणारे व स्वातंत्र्यलढ्याच्या पहिल्या पर्वात हसतहसत फासावर गेलेले आद्य क्रांतिवीर राजे ...

सावंतपूर : इंग्रजांशी सतत चौदा वर्षे प्राणपणाने लढा देणारे व स्वातंत्र्यलढ्याच्या पहिल्या पर्वात हसतहसत फासावर गेलेले आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा इतिहास तरुणांना प्रेरणादायी असूनही तो दुर्लक्षित राहिल्याची खंत प्रगतशील लेखक संघाचे जिल्हाध्यक्ष मारुती शिरतोडे यांनी व्यक्त केली.

रामानंदनगर (ता. पलूस) येथे समाजवादी प्रबोधिनी, लोकशाही वाचवा कृतिशील विचार मंच, श्री समर्थ साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळ व व्ही. वाय. (आबा) पाटील समाज प्रबोधन अकॅडमी यांच्यातर्फे आयोजित आचार्य शांतारामबापू गरुड स्मृती व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना 'आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जीवन व कार्य' या विषयावर ते बोलत होते. ‘क्रांतिअग्रणी पर्व’चे संपादक व्ही. वाय. (आबा) पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रा. आदम पठाण यांनी स्वागत केले.

शिरतोडे म्हणाले. मराठेशाहीचा अस्त झाल्यानंतर स्वातंत्र्यलढा सुरू झाला. या स्वातंत्र्यलढ्याचे चार टप्पे पडतात. या चार टप्प्यांतील पहिल्या पर्वात उमाजी नाईक या रामोशी वीराने ब्रिटिशांच्या कंपनी सरकारला सळो की पळो करून सोडले. ब्रिटिश सैनिकांच्या पलटणी उमाजीला पकडण्यासाठी जिवाचे रान करीत होत्या परंतु डोंगरदऱ्यात लपून-छपून गनिमीकाव्याने इंग्रजांशी उमाजीने प्रखर बंड उभारले. उमाजी नाईकांच्यापासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत साडेतीन लाख हुतात्मे झाले आहेत. अनेकांनी कारावास भोगला आहे. बलिदान दिले आहे. त्यांच्या प्राण त्यागावरच आपल्या देशाचे स्वातंत्र्य आज उभे आहे. तेव्हा हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, देशाच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी सजग राहिले पाहिजे.

व्याख्यानमालेस हिम्मतराव मलमे, दगडू जाधव, संदीप सदामते, सुनील दलवाई, भानुदास आंबी, उत्तम सदामते, मारुती सावंत, बाळासाहेब खेडकर, जयवंत मोहिते, संजय जाधव, महेश मदने, कृष्णत गायकवाड, संजीवनी मोहिते, म. मा. फाटक, बी. बी. खोत यांच्यासह अनेक कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. प्रा. विठ्ठल सदामते यांनी आभार मानले.