शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाड तलाठी कार्यालयात शेकडो नोंदी रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST

कुपवाड : शहरातील तलाठी कार्यालयामध्ये तलाठ्याकडून गोरगरीब नागरिकांच्या गेल्या वर्षभरापासूनच्या नोंदी रखडल्या आहेत. या कार्यालयात तलाठ्याकडून आधी ...

कुपवाड : शहरातील तलाठी कार्यालयामध्ये तलाठ्याकडून गोरगरीब नागरिकांच्या गेल्या वर्षभरापासूनच्या नोंदी रखडल्या आहेत. या कार्यालयात तलाठ्याकडून आधी मेवा आणि मग सेवा हे धोरण अवलंबिले जात असल्याने धनदांडग्यांच्या आणि दलालांच्या नोंदी मात्र त्वरित होत आहेत, असा आरोप नागरिकांमधून होत आहे. गोरगरीब नागरिकांना मात्र कायम हेलपाटे मारावे लागत आहेत. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून दोषी तलाठ्यावर कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

कुपवाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तलाठी कार्यालय आहे. भ्रष्टाचारामुळे या चावडीतील तीन ते चार तलाठ्यावर कारवाई झाली आहे. मागील वर्षी एका तलाठ्यावर पोलीस ठाण्यात कारवाई झाली. त्याच्यावर महसूल विभागाकडून कोणती कारवाई केली गेली हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यातच आहे. त्याच्या जागी नवीन तलाठ्याची नेमणूक झाल्यावर चित्र पालटेल, असे गोरगरीब शहरवासीयांना वाटत होते. मात्र परिस्थिती पूर्वी होती तशीच अनुभवायला मिळत आहे. या कार्यालयात नागरिकांच्या गेल्या वर्षेभरापासूनच्या नोंदी रखडल्या आहेत. या कार्यालयात तलाठ्याकडून आधी मेवा मग सेवा हे धोरण अवलंबिले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. मेवा मिळालेल्यांच्या व दलालांच्या त्वरित नोंदी होत असल्याची चर्चा आहे. गोरगरिबांना कायम हेलपाटे मारावे लागत आहेत. तलाठी कार्यालयात गोरगरीब नागरिकांच्या नोदी होणार की नाही असा प्रश्न सर्वाना पडू लागला आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून दोषींवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

चौकट

ऑनलाइन चुकीची शिक्षा नागरिकांना

कुपवाडमधील एका नागरिकाने एक वर्ष झाले नोंदी घालण्यासाठी अर्ज केला होता. त्यामध्ये तलाठी कार्यालयाकडून ऑनलाइनमध्ये चूक झाली आहे. मात्र वर्षे होऊनही कार्यालयाकडून झालेल्या चुकीमुळे त्या नागरिकाला तलाठी कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. तलाठी बदलले मात्र अजूनही संबंधित नागरिकांचे काम झाले नाही. नोंद घालताना चुकी तलाठ्याची होऊनही त्याची शिक्षा नागरिकांना भोगावी लागत आहे.

चौकट

तलाठी कार्यालयात दलालांचा सुळसुळाट...

कुपवाड तलाठी कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला आहे. विश्रामबागमधील वृध्द नागरिकांचे तर अतोनात हाल होत आहेत. गैरकारभारास जबाबदार धरून दोषी तलाठ्यावर त्वरित कारवाई करावी. गोरगरीब नागरिकांना न्याय मिळावा, अशी मागणी नगरसेवक विनायक सिंहासने यांनी केली आहे.