शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

चांदोली धरणातून ९४४८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग, अनेक पूल गेले पाण्याखाली; वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 11:12 AM

सलग तीन दिवस अतिवृष्टी

श्रीनिवास नागे

वारणावती (जि. सांगली) : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सलग तीन दिवस अतिवृष्टी होत आहे. गेल्या चोवीस तासांत १३८ मिलीमीटर तर दिवसभरात २० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रातून नऊ हजार ४४८ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या वक्राकार दरवाजातून ७७८४ क्युसेक व जलविद्युत केंद्राकडून १६६४ क्यूसेक असा एकूण ९४४८ क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे.शिराळा तालुक्यातील पश्चिम विभागातील चांदोली धरण परिसर पावसाचे आगार समजला जातो. येथे वार्षिक चार ते पाच हजार मिलीमीटर पावसाची नोंद होते. यावर्षी ५ पाच जुलैपासून पावसास उशिरा सुरुवात होऊनही सलग दहा दिवस अतिवृष्टी झाली. आताही सलग तीन दिवस अतिवृष्टी होत आहे. गेल्या चोवीस तासांत १३८ मिलीमीटर व दिवसभरात २० मिलीमीटर पावसासह एकूण १७४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत होती. म्हणून विसर्ग वाढविण्यात आला होता. सध्या नऊ हजार ४४८ क्युसेकने आवक होत आहे. त्यामुळे धरणातील विसर्ग वाढवून तो बुधवारी सकाळी ८ वाजेनंतर ९४४८ क्युसेक केला आहे. धरणातील पाणीसाठा ३१.०५ टीएमसी असून, त्याची टक्केवारी ९०.२६ अशी आहे. पाणी पातळी ६२३.९५ मीटर झाली आहे.पावसाचे प्रमाण वाढल्यास आणखी विसर्ग कोणत्याही क्षणी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन धरण प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

पिके पाण्याखाली, वाहतूक विस्कळीतधरणातील विसर्ग वाढविण्यात आल्याने वारणा नदीकाठावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. आरळा-शित्तूर पुलावर निम्म्या भागात थोडे पाणी आले आहे, तर काही भागात कोरडे आहे. चरण-सोंडोली पुलाला पाणी घासून जात आहे. कोकरूड-रेठरे पूल व मालेवाडी-सोंडोली पूल पाण्याखाली गेले आहेत. शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील वाहतूक बंद झाली आहे तर आरळा-शित्तूर पुलावरून लोकांची ये-जा सुरू आहे.

वाळवा तालुक्यातील शिरगाव ते पलूस तालुक्यातील नागठाणे दरम्यानचा बंधारा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणWaterपाणी