Join us  

लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video

लखनौ सुपर जायंट्सच्या मानहानीकारक पराभवानंतर संघ मालक संजीव गोएंका प्रचंड ( LSG owner Sanjiv Goenka) नाराज दिसले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 11:15 PM

Open in App

IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी ९.४ षटकांत फलकावर विजयी १६७ धावा चढवून सनरायझर्स हैदराबादला विक्रमी विजय मिळवून दिला. लखनौ सुपर जायंट्सच्या मानहानीकारक पराभवानंतर संघ मालक संजीव गोएंका प्रचंड ( LSG owner Sanjiv Goenka) नाराज दिसले आणि ते सामन्यानंतर रागात कर्णधार लोकेश राहुलशी चर्चा करताना दिसले. लखनौच्या गोलंदाजांची धुलाई होताना कॅमेरा जेव्हा जेव्हा गोएंका यांच्याकडे वळला, तेव्हा ते संतापलेले, हतबल दिसले आणि सामन्यानंतर ते लोकेश राहुलसोबत बोलतानाही रागात असल्याचे फोटोतून अंदाज बांधला जात आहे. 

माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना

SRH चा गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पॉवर प्लेमध्ये ( ३-०-७-२) LSG ला जखडून ठेवले. नितिश कुमार रेड्डी व सनवीर सिंग यांनी दोन अविश्वसनीय झेल  घेतले. कृणाल पांड्या ( २४) व लोकेश राहुल ( २९) यांनी लखनौचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. निकोलस पूरन व आयुष बदोनी यांनी पाचव्या विकेटसाठी ५२ चेंडूंत ९९ धावा जोडून लखनौला ४ बाद १६५ धावांपर्यंत पोहोचवले.  बदोनी ३० चेंडूंत ९ चौकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला, तर पूरनने २६ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ४८ धावा केल्या. भुवीने ४ षटकांत १२ धावा देत २ विकेट्स घेतल्या.   

अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी  पॉवर प्लेमध्ये हैदराबादने १०७ धावा चढवल्या. आयपीएलमध्ये हैदराबादने दुसऱ्यांचा पॉवर प्लेमध्ये १००+ धावा केल्या आणि असा पराक्रम करणारा तो पहिलाच संघ ठरला. SRH ने ९.४ षटकांत बिनबाद १६७ धावा करून दणदणीत विजय मिळवला. आयपीएलच्या इतिहासात १५० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग दहा षटकांच्या आत करणारा हा पहिला संघ ठरला. अभिषेकने २८ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ७५ धावा केल्या, तर हेडने ३० चेंडूंत ८ चौकार व ८ षटकारांसह नाबाद ८९ धावा कुटल्या.   हा सामना जिंकून हैदराबाद १२ सामन्यांत १४ गुण मिळवत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले. लखनौला पण ही संधी होती, परंतु त्यांनी आज निराश केले. त्यांना १२ सामन्यांत ६ विजय मिळवता आले आहेत आणि ते सहाव्या क्रमांकावर राहिले आहेत. 

टॅग्स :आयपीएल २०२४लोकेश राहुललखनौ सुपर जायंट्ससनरायझर्स हैदराबाद