Join us  

ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड

या 22 वर्षीय भारतीय खेळाडूने IPA 2023 मध्ये 14 डावांत 48.07 च्या सरासरीने आणि 163.61 च्या स्ट्राइक रेटने 625 धावा केल्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 11:40 PM

Open in App

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराने भारताच्या एका युवा फलंदाजासंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. हा युवा फलंदाज आपले सर्व विक्रम मोडू शकतो, असे लाराने म्हटले आहे. या 22 वर्षीय भारतीय खेळाडूने IPA 2023 मध्ये 14 डावांत 48.07 च्या सरासरीने आणि 163.61 च्या स्ट्राइक रेटने 625 धावा केल्या होत्या. या खेळाडूचे नावा आहे यशस्वी जैस्वाल...

आयपीएलमधील यशानंतर, यशस्वीला भारतीय संघात संधी मिळाली. त्याने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार शतक (171) ठोकले. जयस्वालने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 9 कसोटी आणि 17 टी-20 सामने खेळत आपल्या फलंदाजी क्षमतेची झलक दाखवली आहे. ज्याने लाराला धाडसी दावा करण्यास भाग पाडले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम लाराच्या नावावर आहे. त्याने 2004 मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद 400 धावा केल्या होत्या.

काय म्हणाला लारा? -पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत लारा म्हणाला, "जर मला वाटत असेल की माझा विक्रम धोक्यात आहे, तर जयस्वालकडे तसे करण्याची चांगली संधी आहे. त्याच्या नावावर आधीच काही द्विशतके आहेत." यशस्वी नुकताच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मालिकावीर ठरला. त्याने 9 डावात 89 च्या सरासरीने 712 धावा केल्या होत्या. दरम्यान त्याने दोन द्विशतके आणि तीन अर्धशतके ठोकली. टी-20 विश्वचषकासाठीही भारतीय संघात त्याची निवड झाली आहे. तो कर्णधार रोहित शर्मासोबत ओपनिंग करेल, असे मानले जात आहे. 

टॅग्स :यशस्वी जैस्वालराजस्थान रॉयल्स