शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळाप्रकरणी आज सुनावणी

By admin | Updated: November 30, 2015 01:16 IST

जिल्हा बॅँक : संचालकांना म्हणणे मांडण्याची संधी

सांगली : जिल्हा बॅँकेतील ४ कोटी १८ लाखांच्या घोटाळाप्रकरणी सोमवारी ३० नोव्हेंबर रोजी चौकशी अधिकारी श्रीधर कोल्हापुरे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. याप्रकरणी गत सुनावणीवेळी १३ माजी संचालक व अधिकाऱ्यांनी म्हणणे सादर केले होते. १२ जणांनी म्हणणे सादर करण्यास मुदतवाढ मागितली होती. घोटाळ्याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी ४० माजी संचालक, तीन माजी कार्यकारी संचालक, ११ अधिकाऱ्यांसह १६ वारसदार अशा ७० जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. यापूर्वी झालेल्या पहिल्या सुनावणीवेळी १४ जणांनी म्हणणे सादर केले होते. ३० जणांनी मुदतवाढीची मागणी केली. नोव्हेंबरपासून आरोपांबाबतच्या युक्तिवादाला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा बँकेचे २००१-०२ ते २०११-१२ या कालावधितील बँकेच्या प्रधान कार्यालयाचे रंगकाम व दुरुस्ती, अमृतमहोत्सवी कार्यक्रमातील खर्च, नोकरभरती, इमारत बांधकामासाठी केलेला खर्च, बँक गॅरंटी शुल्क परत देण्याचा व्यवहार, बचत गट संघास दिलेले मानधन, निवृत्त अधिकाऱ्यांवर केलेला पगाराचा खर्च, जादा दराने केलेली सीसीटीव्ही खरेदी, एकरकमी परतफेड योजनेतील सवलत, संचालक मंडळांचा अभ्यास दौरा अशा अनेक नियमबाह्य गोष्टी निदर्शनास आल्या होत्या. जिल्हा विशेष लेखापरीक्षक कोल्हापुरे यांनी ४ कोटी १८ लाख रुपयांच्या गैरव्यवहाराची जबाबदारी संचालक व कार्यकारी संचालकांवर निश्चितीसाठी चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी ४४ माजी संचालक व तीन तत्कालीन कार्यकारी संचालकांना नोटीस दिली होती. त्यानंतर मृत चार संचालकांच्या १६ वारसदारांनाही सुनावणीसाठी नोटिसा बजाविल्या. (प्रतिनिधी)संचालकांवर आरोप निश्चितगेले चार महिने सुनावणीचे काम सुरू होते. यात संचालक, अधिकाऱ्यांनी आपले म्हणणे सादर केले आहे. त्यानंतर कोल्हापुरे यांनी बँकेचे संचालक, अधिकारी व मृत संचालकांचे वारसदार अशा एकूण ७० जणांवर आरोप निश्चित केले आहेत. बँकेच्या नुकसानीला संबंधितांना जबाबदार धरून वसुली का करण्यात येऊ नये, अशी नोटीस त्यांनी बजाविली होती.