शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जतच्या जागेसाठी दिग्गजांच्या खेळ््या

By admin | Updated: May 4, 2015 00:35 IST

जिल्हा बॅँक निवडणूक : जनसुराज्यच्या मतांसाठी पतंगराव, जयंतरावांचा गळ

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीत जतच्या जागेसाठी कॉँग्रेसचे आ. पतंगराव कदम आणि राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील आमने-सामने आले आहेत. विलासराव जगताप यांचे पुत्र मनोज जगताप यांना धक्का देऊन विक्रम सावंत यांना या ठिकाणी निवडून आणण्यासाठी पतंगरावांनी जनसुराज्य पक्षाच्या मतदारांना गळ घातला आहे. दुसरीकडे थोडक्यात दगाफटका होऊ नये म्हणून जयंतरावांनीही जनसुराज्यच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या जागेसाठी दोन्ही नेत्यांनी राजकीय ताकद पणाला लावली आहे. जत तालुक्यातील सोसायटी गटात जोरदार चुरस निर्माण झाली आहे. याठिकाणी कॉँग्रेसचे विक्रम सावंत आणि भाजपचे मनोज जगताप यांच्यात लढत होत आहे. भाजपचे आ. विलासराव जगताप यांनी निवडणुकीत पतंगराव कदम व मोहनराव कदम यांना टार्गेट केले होते. त्यामुळे कदम गटाने जगताप यांना धक्का देण्यासाठी या ठिकाणी ताकद पणाला लावली आहे. शनिवारी रात्री पतंगराव कदम यांनी जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांची भेट घेतली. मिरजेतील पक्षाचे युवा संघटना प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत दोन्ही नेत्यांची बैठक झाली. या बैठकीतील निर्णय गुलदस्त्यात असला तरी, कोरे यांनी भाजपच्या नेत्यांना धक्का देण्याचा इशारा दिला आहे. पतंगराव आणि विनय कोरे यांच्यातील बैठकीची माहिती मिळताच जयंत पाटील यांनी विनय कोरे यांच्याशी संपर्क साधला. रविवारी रात्री समित कदम, बसवराज पाटील व अन्य कार्यकर्त्यांशीही त्यांची चर्चा झाली. जतमध्ये थोडक्यात दगाफटका होऊ नये म्हणून खासदार संजय पाटील, जयंत पाटील आणि विलासराव जगताप यांनी सतर्कता बाळगली आहे. रात्री उशिरापर्यंत जतमधील राजकीय हालचालींवर दोन्ही पॅनेलचे नेते लक्ष ठेवून होते. विनय कोरे यांनी याबाबतचा निर्णय अद्याप जाहीर केला नाही. जतमध्ये एकूण ८८ मतदान आहे. यामध्ये भाजपचे बहुमत असले तरी कॉँग्रेसची मतेही त्यांच्या जवळपास आहेत. त्यामुळे जनसुराज्यच्या मदतीने भाजपला धक्का देण्यासाठी कॉँग्रेस नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. (प्रतिनिधी)