शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नाभिक बांधवांना महिन्याला ५० हजार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST

फोटो- इस्लामपूर येथे सलून पार्लरसमोर सदाभाऊ खोत यांनी आंदोलन केले. यावेळी संदीप झेंडे, नीलेश सूर्यवंशी, सर्फराज डाके, अतुल सूर्यवंशी, ...

फोटो- इस्लामपूर येथे सलून पार्लरसमोर सदाभाऊ खोत यांनी आंदोलन केले. यावेळी संदीप झेंडे, नीलेश सूर्यवंशी, सर्फराज डाके, अतुल सूर्यवंशी, मोहसीन पटवेकर उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : राष्ट्रीय नाभिक संघटना व रयत क्रांती संघटना यांच्या वतीने राज्यातील नाभिक बांधवांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी सलून पार्लरसमोर आंदोलन करण्यात आले. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर येथे मागण्यांचे फलक हातात धरून घोषणा देत सरकारचा निषेध केला.

आमदार खोत म्हणाले, कोरोनाच्या महामारीमध्ये राज्यातील अनेक सलून व्यावसायिकांनी आर्थिक संकटामुळे आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या केलेल्या नाभिक बांधवांना सरकारने कोणतीही मदत केलेली नाही. गेली अनेक दिवस सरकारने लॉकडाऊन केल्यामुळे सलून दुकाने उघडता आली नाहीत. अनेक नाभिक बांधवांची दुकाने भाड्याने आहेत. त्याचे भाडे, वीजबिल त्यांच्या अंगावर आले आहे. जर सरकारला दुकाने बंद ठेवायची असतील तर सलून व्यावसायिकांना सरकारने प्रतिमहिना ५० हजार रुपये मदत देऊन त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी. जर सरकार त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणार नसेल तर पुढे तीव्र आंदोलन करू.

यावेळी लालासाहेब पाटील, बजरंग भोसले, संदीप झेंडे, नीलेश सूर्यवंशी, मोहसीन पटवेकर, सर्फराज डाके, अजित शिंदे, गणेश सूर्यवंशी, वसंतराव गायकवाड, अतुल सूर्यवंशी, विनोद सूर्यवंशी, तोसिफ इबुसे, महमद इबुसे, जितेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.