शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
4
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
6
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
7
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
8
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
9
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
10
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
11
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
12
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
13
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
14
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
15
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
16
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
17
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
18
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
19
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
20
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात गुऱ्हाळांच्या चिमण्या थंडावल्या

By admin | Updated: April 1, 2015 00:08 IST

गळिताची सरासरी घटली : अपेक्षित दराअभावी शेतकऱ्यांचा तोटा

सहदेव खोत -पुनवत  -गेले तीन-चार महिने शिराळा तालुक्यात सुरू असलेल्या गुऱ्हाळांचा हंगाम आता संपला आहे. तालुक्यातील काही गूळ कलमांना मिळालेला पाच-सहा हजाराच्या आसपास, तर कणदूरच्या गूळ मोदकांना मिळालेला नऊ हजाराचा दर वगळता, यावर्षी सर्वच गुऱ्हाळांतील शेतकऱ्यांना सरासरी तीन हजारच दर मिळाल्याने, तोटा झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत. शिराळा तालुक्यात गुऱ्हाळ हंगामाची सुरुवात गेल्या दिवाळीदरम्यान झाली. गुऱ्हाळ मालकांनी मोठे भांडवल गुंतवून गळिताला सुरुवात केली. वास्तविक शिराळा तालुक्यातील गुळाला, विशेषत: कणदूरच्या गुळाला चांगला दर्जा असल्याने यावर्षी चांगला दर मिळेल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र शेतकऱ्यांची ही अपेक्षा फोल ठरली.
यावर्षी गूळ दराची सुरुवात प्रति क्विंटल दोन हजारानेच झाली. पहिल्या एक-दोन महिन्यात तर शेतकऱ्यांना २०००, २२००, २४००, २६०० रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांची निराशाच झाली. संक्रांतीच्या दरम्यान गूळ भाव वधारण्यास सुरुवात झाली. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी दर मिळाला नाही.
तालुक्यातील असंख्य गुऱ्हाळघरे गळिताला ऊस नसल्याने महिन्यापूर्वीच बंद झाली आहेत. तालुक्यात सुमारे २५ गुऱ्हाळ घरांतून यावर्षी सुमारे सव्वालाख टन उसाचे गाळप झाले. मात्र वाढलेला उत्पादन खर्च व गूळ दरात झालेली घसरण यामुळे गुऱ्हाळापेक्षा कारखानेच बरे, अशा भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
एकंदरीत गेल्यावर्षी काही कलमे ७००० रुपयांपर्यंत पोहोचली होती. मात्र यावर्षी हा दर ६००० रुपयांच्या आसपासच राहिला, तर सरासरी दर ३००० ते ३५०० रुपयांपर्यंतच राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांत ‘कही खुशी, कही गम’ अशी परिस्थिती राहिली.


गुऱ्हाळ मालकांची धडपड
अपेक्षित दर नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी गुऱ्हाळातील गळिताकडे यंदा पाठ फिरविली. अशावेळी गुऱ्हाळ उद्योग टिकविण्यासाठी फायद्या-तोट्याचा विचार न करता, शेतकऱ्यांचा उभा ऊस ठरवून घेऊन त्या उसावर काहीकाळ गुऱ्हाळघरे चालवली व कामगारांना गुंतवून ठेवले. शेतकऱ्यांनी सुद्धा नफ्या-तोट्याचा विचार न करता उभा ऊस ठरवून गुऱ्हाळ मालकांना विकून एकरकमी पैसे घेतले.



यावर्षी ३००० ते ३५०० पर्यंतच सरासरी राहिल्याने शेतकऱ्यांसह गुऱ्हाळ मालकांना फटका बसला आहे. अनेकांच्या प्रतिवर्षी दोन लाखांवर निघणाऱ्या गूळपट्ट्या यावर्षी दराअभावी निम्म्यानेच निघाल्या आहेत. दराअभावी यावर्षीचा हंगाम तोट्यात गेला आहे.
- प्रदीप पाटील, गुऱ्हाळ मालक, कणदूर