शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात कूपनलिकेमध्ये अडकलेल्या नागाची सुटका

By admin | Updated: November 23, 2014 00:43 IST

दोन तास धडपड : शिराळकरांनी पुन्हा दिली नागप्रेमाची प्रचिती

शिराळा : नाग आणि शिराळकरांच्या प्रेमाचे नाते कित्येक वर्षांचे. या प्राण्याला दैवत मानून त्याच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या शिराळकरांची ख्यातीही सर्वदूर पसरलेली आहे. याची प्रचिती देणाऱ्या शेकडो घटना याठिकाणी घडत असतात. जवळपास वीस फूट खोल कूपनलिकेमध्ये अडकलेल्या पाच फूट नागास दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढून त्यास जीवदान देण्याच्या घटनेने या प्रेमाची पुन्हा प्रचिती दिली. येथील गोरक्षनाथ रस्त्यावरील रमेश कांबळे यांच्या शेतात सहा इंच वीस फूट खोलीची बंद अवस्थेतील कूपनलिका आहे. या कूपनलिकेपासून ४० फुटांवर विहीरही आहे. दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान विहिरीवरील चालू असणारा विद्युतपंप बंद करण्यासाठी जात असताना विक्रम रमेश कांबळे यांना बंद कूपनलिकेमधून नागाच्या फुत्कारण्याचा आवाज आला. यानंतर या कूपनलिकेमध्ये विक्रम कांबळे, मुबारक नदाफ, अवधूत इंगवले, राजू पाटील, विशाल कांबळे, हमीद आत्तार यांनी बॅटरीच्या सहाय्याने आत पाहिले असता नाग अडकलेला त्यांना दिसला. त्यांनी त्वरित काठी व इतर साहित्याच्या सहाय्याने नागास बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. नदाफ यांनी लोखंडी हूक दोरीच्या सहाय्याने कूपनलिकेमध्ये सोडला. चार ते पाचवेळा प्रयत्न केल्यावर नाग हुकात येऊन अडकला. त्यानंतर दोर वर घेऊन नागास बाहेर काढण्यात आले. शिराळकर नागांना इजा पोहोचवत नाहीत व मारतही नाहीत, त्यांच्यावर जिवापाड प्रेम करतात. नागपंचमीच नव्हे, तर कोणत्याही वेळेला नाग सापडला तर, त्यास मारत नाहीत. (वार्ताहर)