शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गलाई उद्योजक गडकरींना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST

विटा : मराठी बांधवांनी देशाच्या विविध राज्यांत सुरू केलेल्या सोने-चांदी गलाई व्यवसायाला भारत सरकारने कायदेशीर मान्यता देऊन या उद्योगाचा ...

विटा : मराठी बांधवांनी देशाच्या विविध राज्यांत सुरू केलेल्या सोने-चांदी गलाई व्यवसायाला भारत सरकारने कायदेशीर मान्यता देऊन या उद्योगाचा राजपत्रात समावेश करावा, ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीसाठी अखिल भारतीय सोने-चांदी गलाई संघटनेचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. दि.२ फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता मंत्री गडकरी यांनी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी उद्योजक शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.

सांगली, सातारा, सोलापूर यांसह विविध जिल्ह्यांतील अनेक लोक सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यांत विखुरले आहेत. सुमारे तीन लाख कुटुंबे हा व्यवसाय करीत आहेत. परंतु, हा व्यवसाय आज अनेक समस्येतून मार्गक्रमण करीत आहे. या व्यवसायाला कायदेशीर मान्यता मिळावी व त्याचा उद्योग व्यवसायाच्या राजपत्रात समावेश केल्यास व्यवसाय वाढीसाठी चांगले वातावरण निर्माण होऊन त्याला प्रतिष्ठा मिळणार आहे. सोने-चांदी गलाई उद्योजकांनी ही मागणी केल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे ही मागणी तत्काळ मान्य करावी, यासाठी काशी मराठा समाजाचे अध्यक्ष व मराठी समाजाचे वरिष्ठ महामंत्री संतोष पाटील यांनी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना पत्र दिले होते. त्यानंतर माजी राज्यपाल नाईक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लेखी पत्र देऊन याबाबत निर्णय घ्यावा, असे सूचित केले होते.

त्यानुसार केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सोने-चांदी गलाई उद्योजकांच्या शिष्टमंडळाला दि. २ फेब्रुवारीला दिल्ली येथील निवासस्थानी चर्चेसाठी बोलविले आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी मराठी समाज उत्तर प्रदेशचे संस्थापक अध्यक्ष उमेशकुमार पाटील, काशी मराठा समाजाचे अध्यक्ष संतोष पाटील, अखिल भारतीय सोने-चांदी रिफायनरी संघटनेचे गोल्ड कौन्सिल समन्वयक उदय शिंदे यांच्यासह शिष्टमंडळ चर्चेसाठी उपस्थित राहणार आहे. ही चर्चा नक्कीच सकारात्मक होऊन परप्रांतातील उद्योजकांना नक्कीच न्याय मिळेल, अशी अपेक्षा संघटनेचे वरिष्ठ महामंत्री संतोष पाटील यांनी व्यक्त केली.