शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

गळीत हंगामापूर्वीच एफआरपीचा प्रश्न पेटणार

By admin | Updated: September 27, 2015 00:44 IST

जिल्ह्यातील स्थिती : मागील हंगामातील एफआरपी देण्यास साखर कारखाने तयार

सांगली : एफआरपीनुसार दर देण्यासाठी कारखान्यांच्या कर्जावरील व्याजाची हमी शासनाने घेतली आहे. त्यानुसार बँकांनी साखर कारखान्यांना कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे बहुतांशी कारखाने शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर देण्यास तयार आहेत. परंतु, २०१५-१६ च्या हंगामात एका हप्त्यात एफआरपी देण्यास कारखानदार तयार नसून, तीन हप्त्यांची तयारी दर्शविली आहे. हा मुद्दा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटनांनाही मान्य नाही. यामुळे गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच या मुद्यावरून कारखानदार आणि संघटनांमध्ये संघर्ष पेटणार आहे. जिल्ह्यात २०१४-१५ या वर्षामध्ये दहा वर्षांतील विक्रमी ७७ लाख ४३ हजार ४३२ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, ९४ लाख ७४ हजार ५०३ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. साखरेचा उतारा सरासरी १२.२४ टक्के मिळाला आहे. साखरेचे दर सलग दीड वर्ष कमीच होत गेल्यामुळे कारखान्यांचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडले होते. त्यामुळे साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी दिली नाही. एफआरपीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना व अन्य शेतकरी संघटनांनी तीव्र आंदोलनही छेडले होते. सरकारने एफआरपीचा दर देण्यासाठी कारखान्यांकडे तगादा लावला होता. अखेर शेतकऱ्यांना एफआरपीनुसार रक्कम देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कारखान्यांना कर्ज देण्याचा निर्णय घेतला. या कर्जाचे व्याज केंद्र आणि राज्य शासन भरणार असून, तशी हमी घेतल्याचे पत्र त्यांनी बँकांना पाठविले आहे. राजारामबापू, हुतात्मा, विश्वासराव नाईक, क्रांती, सोनहिरा आदी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाने दि. ३० सप्टेंबरपर्यंत एफआरपीनुसार राहिलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे सांगितले. उर्वरित साखर कारखान्यांची एफआरपी कमी असल्यामुळे तेही देण्यास तयार आहेत. मागील गळीत हंगामाचा प्रश्न सुटणार आहे. यावर्षीचा गळीत हंगाम १५ आॅक्टोबरला सुरू होणार आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी साखर कारखानदारांनी एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात देणार असल्याचे सांगितले आहे. शेतकरी संघटनांनी मात्र एकरकमीच एफआरपीची रक्कम देण्याची मागणी केली आहे. कारखानदार आणि संघटनांचे प्रतिनिधी आपल्या मतावर ठाम राहिल्यास कारखान्यांचे गळीत हंगाम यावर्षीही वेळेवर सुरू होण्याची शक्यता धुसर दिसत आहे. संघटना आणि कारखानदारांमध्ये दरावरून तोडगा काढताना राज्य शासनाची चांगलीच दमछाक होणार आहे. यावर्षीची एफआरपी प्रति टन उसाला २५०० ते २६०० रुपये होणार आहे. साखरेचे दर कमी-जास्त होत असल्याने ही एफआरपी देतानाही कारखान्यांची दमछाक होणार आहे. (प्रतिनिधी)