शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
6
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
7
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
8
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
9
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
10
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
11
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
12
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
13
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
14
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू पाणी योजनेच्या प्रतीक्षेत चौदा गावे

By admin | Updated: September 18, 2015 23:10 IST

कवठेमहांकाळची स्थिती : कामे अपूर्ण; केवळ घोषणाबाजी

लखन घोरपडे- देशिंग  कवठेमहांकाळ तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यापासून वंचित राहिलेल्या भागाला पाणी देण्यासाठी टेंभू योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मागे ही योजना पुरेशा निधीअभावी रखडली असून, या योजनेच्या लाभक्षेत्रातीन चौदा गावे अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्याचा कायमस्वरूपी दुष्काळ हटावा, यासाठी आर. आर. पाटील, अजितराव घोरपडे यांच्यासह नेत्यांनी ‘म्हैसाळ’पासून वंचित राहिलेल्या भागाला पाणी देण्यासाठी टेंभू योजनेचा प्रारंभ केला. या योजनेअंतर्गत ७८७२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून ही योजना सुरू झाल्यास संपूर्ण कवठेमहांकाळ तालुका ‘म्हैसाळ’ व ‘टेंभू’च्या पाण्याने ओलिताखाली येणार आहेत.टेंभू योजनेअंतर्गत कुंडलापूर, तिसंगी, नागाव, चोरोची रायवाडी, गर्जेवाडी, तसेच नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या आठ गावांचा समावेश असून ही योजना वरदान ठरणारी आहे.योजनेच्या प्रारंभापासून ते आजअखेरपर्यंत नेतेमंडळीं कडून केवळ घोषणाबाजी केली जात असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तासगावमधील कार्यक्रमासाठी आले असता, टेंभू योजनेच्या पाहणी दौऱ्यानिमित्तच्या सभेत त्यांनी ५० कोटी जाहीर केले. मात्र अद्याप यावर कोणतीच कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. या योजनेस २००१ मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र २२ जानेवारी २००४ रोजी सुधारित प्रकल्प अहवालास २१०६.०९ कोटी रुपयांना शासनाने मान्यता दिली. यामध्ये तिसंगी घाटनांद्रे, कुंडलापूर उपसा सिंचन योजनेचाही समावेश करण्यात आला आहे. एकंदरीतच तालुक्यातील ‘म्हैसाळ’च्या पाण्याच्या ओलिताखाली येणारा भाग त्याचा लाभ घेत आहे, तर या पाण्यापासून वंचित राहिलेला परिसर योजना मंजूर असूनदेखील अर्धवट कामे, अपुरा निधी, तसेच प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे या भागाला पाण्यासाठी भटकावे लागत आहे. एकूणच या भागाला ‘टेंभू’चे पाणी मिळणार तरी केव्हा? असा सवाल आता येथील शेतकरी करू लागले आहेत. ही योजना त्वरित पूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू, असा इशाराही येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. ‘टेंभू’च्या लाभक्षेत्रातील गावे प्रतीक्षेततिसंगी, कुंडलापूर, नागज, ढालगाव, चोरीची, रायवाडी, घाटनांद्रे, गर्जेवाडी, वाघोली, दुधेभावी, ढोलेवाडी, जांभुळवाडी, चुडेखिंडी, कदमवाडी ही गावे लाभक्षेत्रात आहेत. याबाबत प्रगतशील शेतकरी सखाराम घोदे म्हणाले, ढालगावसह परिसराला पाणी देण्यासाठी युती शासनाच्या काळात टेंभू योजना सुरू झाली. त्यानंतर आर. आर. पाटील यांनीही पूर्ततेसाठी प्रयत्न केले. परंतु सध्या या योजनेचे काम थांबले आहे. शिवाय या भागातील दुष्काळ हटवायचा असेल, तर योजना पूर्ण होणे गरजेचे आहे.