शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sangli Politics: शिराळ्यात राजकीय भूकंप होणार; मानसिंगराव, शिवाजीराव नाईक महायुतीसोबत जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 19:21 IST

राष्ट्रवादी, शिंदेसेनेची ताकद वाढणार

विकास शहाशिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघात आता पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिराळा मतदारसंघात विरोधक राहणार नसल्याची स्थिती निर्माण होणार आहे. सत्ताधारी महायुतीसोबत शिराळा मतदारसंघातील दोन माजी आमदार जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये माजी आमदार मानसिंगराव नाईक हे अजित पवार गटात व शिवाजीराव नाईक हे शिंदेसेनेत प्रवेशाची मतदारसंघातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.१९७८ पासून शिराळा मतदारसंघात कायम काहींना काही राजकीय घडामोडी होत आहेत. शिराळ्यात शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव नाईक व फत्तेसिंगराव नाईक हे गट कार्यरत होते. यामध्ये नानासाहेब महाडिक यांचा गटही कार्यरत झाला. १९९५ मध्ये मोठी घडामोड होऊन दोन नाईक गट एकत्र आले. यावेळी राजकीय समीकरण बदलून काँग्रेसची सत्ता गेली. यानंतर पुन्हा नाईक, देशमुख, नाईक व महाडिक या राजकीय गटांची युती वेगवेगळ्या पद्धतीने बदलत गेली.बदलत्या समीकरणाने शिवाजीराव नाईक व मानसिंगराव नाईक यांना आमदारकीची संधी मिळाली. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे सत्यजीत देशमुख निवडून आले. राज्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदेसेना यांची सत्ता आहे. या बदलत्या राजकीय समीकरणाचा फटका मानसिंगराव नाईक व शिवाजीराव नाईक यांना बसला. त्यामुळे दोन्ही नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिंदेसेनेसोबत जाणार असल्याचे चर्चा सुरू झाली आहे.

राजीनामा अन् विधान परिषद..राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक जिल्हाध्यक्षपदाचा विराज नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला. हा राजीनामा म्हणजे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या गळ्यात विधान परिषदेची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे विराज यांनी राजीनामा दिला असावा, अशी राजकीय गोटात चर्चा आहे.

टॅग्स :Sangliसांगलीshirala-acशिराळाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुती