शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

माजी संचालकांवर लवकरच आरोपपत्र

By admin | Updated: May 16, 2015 00:02 IST

जिल्हा बँक घोटाळा : ३८ संस्थांना नियमबाह्य १५७ कोटींचा लाभ; १०४ जणांनी मांडले म्हणणे

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्जाचा आणि कर्ज परतफेडीचा ३८ संस्थांना १५७ कोटींचा नियमबाह्य लाभ देऊन बँकेचे नुकसान केल्याप्रकरणी माजी संचालक, तत्कालीन अधिकारी आदी १०४ जणांनी शुक्रवारी चौकशी अधिकाऱ्यांसमोर म्हणणे मांडले. सहकार संस्था अधिनियम १९६० कलम ७२ (२) ची अंतिम चौकशी पूर्ण झाली असून, उर्वरितांना २५ मेपर्यंत लेखी म्हणणे सादर करण्यासाठी अंतिम मुदत दिली आहे.जिल्हा बँकेचे तत्कालीन संचालक, अध्यक्ष, माजी कार्यकारी संचालक यांनी नियमबाह्य, विनातारण व मर्यादा ओलांडून २१ संस्थांना कर्जवाटप केले होते. याचबरोबर १७ संस्थांना दिलेल्या कर्ज येणेबाकीतील सूट यामुळे जिल्हा बँकेस १५७ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा ठपका महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ८३ च्या चौकशीत ठेवला होता. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ८८ नुसार दोषींवर जबाबदारी निश्चितीसाठी चौकशी सुरु आहे. माजी संचालक, तत्कालीन कार्यकारी संचालक व मृत माजी संचालकांच्या वारसांसह एकूण १०२ जणांना खुलासे, म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस बजावलेली आहे. त्यांचे खुलासे सादर झालेले आहेत.दरम्यान, ३८ संस्थांच्या कर्जप्रकरणी १५७ कोटीच्या नुकसानीवरून माजी संचालकांना सरसकटपणे नुकसानीबाबत नोटिसा दिल्या होत्या. त्याला माजी संचालकांतर्फे वकिलांनी आक्षेप घेतला होता. कर्जप्रकरणांची छाननी करावी, ज्या प्रकरणाशी ज्याचा सहभाग आहे, अथवा मंजुरीच्या सभेला जे उपस्थित आहेत, त्यांनाच नोटीस देणे आवश्यक आहे, असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून छाननी करून माजी संचालकांना फेरनोटिसा काढल्या. त्यावर शुक्रवारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत चौकशी अधिकारी तथा कऱ्हाडचे उपनिबंधक (सहकारी संस्था) संपतराव गुंजाळ यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी संबंधित माजी संचालक, तत्कालीन अधिकारी यांचे म्हणणे ऐकूण घेतले आणि खुलासेही स्वीकारले आहेत. यावेळी बँकेला १५७ कोटींचे नुकसान करण्यामध्ये काही माजी संचालक आणि तत्कालीन अधिकाऱ्यांचा समावेश नसल्यामुळे त्यांना वगळल्याची खात्रीशीर माहिती आहे. पण, यातून नक्की कुणाला वगळले, याची ठोस माहिती चौकशी अधिकाऱ्यांकडून मिळाली नाही.या चौकशीनंतर आता सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७२ (३) नुसार दोषी माजी संचालक, अधिकाऱ्यांवर आरोपपत्र ठेवण्यात येणार असल्याचे चौकशी अधिकारी गुंजाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)...तर संचालक पदाला मुकावे लागणारबँकेचे १५७ कोटींचे नुकसान केल्याप्रकरणात काही विद्यमान संचालक दोषी दिसत आहेत. या संचालकांवर दोषारोपपत्र निश्चित झाल्यास त्यांना पदाला मुकावे लागणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.काही संचालक मृत झाले असून त्यांच्या वारसांना बाजू मांडण्याची नोटीस बजाविली होती. परंतु, त्यांच्याकडून वेळेत खुलासे सादर झाले नाहीत. म्हणून त्यांच्या वारसांना २५ मेपर्यंत खुलासे सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. या कालावधित त्यांनी खुलासे सादर न केल्यास वारसांच्या मालमत्तेवर बोजा चढवून रक्कम वसुली होणार आहे. यामुळे वारसांची पंचाईत होण्याची शक्यता आहे.