शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी संघटनेत पहिली बंडखोरी

By admin | Updated: September 23, 2014 00:11 IST

इस्लामपूर मतदारसंघ : जिल्हाध्यक्ष बी. जी.पाटील यांचा अर्ज दाखल

इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून बंडखोरीचा पहिला झेंडा उंचावत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बाबासाहेब गणपती ऊर्फ बी. जी. पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील, शिवसेनेचे भीमराव माने यांच्या समर्थकांसह इतरांनी १८ अर्ज निवडणूक कार्यालयातून घेतले. आतापर्यंत एकूण २८ अर्जांचे वाटप झाले आहे.स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्याकडून न्याय मिळणार नसल्याची खात्री झाल्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून बी. जी. पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा आज उमेदवारी अर्ज दाखल करुन स्पष्ट केला. कर्मवीर जयंतीचे औचित्य आणि पितृपक्ष पंधरवड्यातील अशुभ काळाला न जुमानता पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी पंचायत समितीमधील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत पदयात्रा काढून निवडणूक कार्यालय गाठले. यावेळी दादासाहेब पाटील, मकरंद करळे, शहाजी पाटील, आप्पासाहेब पाटील, अ‍ॅड. सुहास माळी, महेश पाटील, पै. अनिल पाटील उपस्थित होते.दरम्यान, आज एकूण ११ जणांनी १८ उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयातून घेतले. जयंत पाटील समर्थक बाळासाहेब पाटील व जितेंद्र पाटील यांच्यासाठी हेमंत पाटील यांनी, तर शिवसेनेच्या भीमराव माने यांच्यासाठी विजय वाले यांनी अर्ज घेतले. (वार्ताहर)