शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव-सांगली रस्त्यावरील झाडांना आगीची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कवठे एकंद : तासगाव-सांगली रस्त्याकडेला आगीच्या झळीने झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. कवठेएकंद परिसरात गेल्या दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कवठे एकंद : तासगाव-सांगली रस्त्याकडेला आगीच्या झळीने झाडांचे मोठे नुकसान झाले आहे.

कवठेएकंद परिसरात गेल्या दोन महिन्यात चार वेळा झाडांना आग लागण्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

कवठेएकंद परिसरात तासगाव-सांगली रस्त्याच्या दुतर्फा वडासह अन्य झाडे आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखभालीअभावी नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान होत आहे.

गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी बांधावरील गवत पेटवले. त्यावेळी दहा ते पंधरा झाडांना या आगीची झळ बसली. रात्रीच्या वेळी अज्ञाताने ही आग लावली होती. याशिवाय कवठेएकंद पाणी योजना कार्यालयासमोरील कचरा पेटवून दिल्याने चार-पाच झाडांना झळ बसली होती.

तासगाव-सांगली मार्गावर असे प्रकार वारंवार घडत आहेत. नागाव रस्त्यावर वडाच्या झाडालाही आग लागल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. अशा घटनेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच स्थानिक प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. यामुळे झाडांना आग लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

काही ठिकाणी जाणीवपूर्वक असे प्रकार घडवून आणले जात आहेत. त्यामुळे आगी लागण्याच्या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

आगीची घटना घडल्यानंतर किंवा बातमी आल्यानंतर बऱ्याच वेळा वृक्षसंवर्धनाबाबतची चर्चा फक्त सोशल मीडियापुरतीच मर्यादित दिसून येते.

बऱ्याचवेळा टेलिफोन लाईनची खुदाई, पाईपलाईन खुदाई, रस्ता दुरुस्ती अशी कामे करताना झाडांच्या सुरक्षेबाबत काळजी केली जात नाही.

फोटो ओळ : कवठेएकंद (ता. तासगाव) येथे तासगाव-सांगली मार्गालगत गवत पेटविल्याने आगीची झळ बसून झाडांचे नुकसान झाले.