शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंतदादा’च्या आर्थिक संकटात भर

By admin | Updated: December 26, 2014 23:48 IST

जागा विक्रीच्या १०९ निविदा अपात्र : शासनाच्या अभिप्रायानंतरच निर्णय

सांगली : येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या २१ एकर जागेवरील १०३ प्लॉटच्या खरेदीसाठी १२३ निविदा दाखल झाल्या होत्या. मात्र त्यातील १०९ निविदाधारकांनी नियमानुसार बयाणा रकमेचे डी.डी. देण्याऐवजी धनादेश दिल्याने नियमांचा भंग झाला असून, त्या निविदा अपात्र ठरल्या आहेत. या सर्व गोंधळामुळे जागा विक्रीची प्रक्रिया पुन्हा अडचणीची ठरत असून, कारखान्यासमोरील आर्थिक संकटात भर पडली आहे. दरम्यान, चौदा निविदाधारकांना जागेची विक्री करायची का, यावर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाकडे अभिप्राय मागविला असल्याचे जागा विक्री समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी सांगितले.उसाची बिले भागविण्यासाठी साखर आयुक्तांच्या आदेशाने मिरज तहसीलदारांनी कारखान्याला मालमत्ता जप्तीची नोटीस बजाविली होती. शेतकऱ्यांच्या देण्यांसोबतच जिल्हा बँकेचे ७८ कोटींचे कर्ज कारखान्यावर आहे. परिणामी बँका व शेतकऱ्यांची थकित देणी देण्यासाठी संचालक मंडळाने कारखान्याची २१ एकर जागा विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. कारखान्याच्या उत्तर बाजूला सांगली-माधवनगर रस्त्यालगतच ही जागा आहे. त्यामुळे या जागेला चांगली किंमत मिळून कारखान्याची देणी भागतील, असा तर्क काढण्यात आला होता. त्यानुसार जागा विक्रीचा प्रस्ताव साखर आयुक्तांकडे देण्यात आला होता. या २१ एकर जागेत १०३ प्लॉट पाडण्यात आले आहेत. जागा विक्रीतून येणारी ५० टक्के रक्कम जिल्हा बँकेला थकित कर्जाच्या वसुलीपोटी, तर उर्वरित ५० टक्के रक्कम कारखान्यास मिळणार आहे. कारखाना या रकमेतून ऊस उत्पादकांची थकित रक्कम आणि कामगारांची देणी देणार होता. १०३ प्लॉटसाठी १२३ निविदा दाखल झाल्या आहेत. त्यापैकी १४ निविदाधारकांनी नियमाप्रमाणे निविदा दाखल केल्या असून उर्वरित १०९ जणांनी निविदेसोबत डी.डी.ऐवजी धनादेश जोडल्यामुळे त्यांची निविदा अपात्र ठरल्याचे कोतमिरे यांनी सांगितले. याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे. (प्रतिनिधी)